दुकाने बार अन् रेस्टारंटची वेळ वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 07:41 PM2020-10-16T19:41:59+5:302020-10-16T19:42:04+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सात वाजेर्पयत मुभा आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील दुकाने, बार, रेस्टारंट दुकानांची वेळ वाढविण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे, विश्वनाथ राणो आणि उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी आज आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दुकानदार व व्यापारी होते. अनलॉकमध्ये दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सात वाजेर्पयत देण्यात आली आहे. ही वेळ वाढवून देण्याची मागणी यापूर्वीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्याच मागणीच्या आधारे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेतली. यावेळी अन्य महापालिका हद्दीत दुकाने सात ऐवजी ९ वाजेर्पयत सुरु करण्यास मुभा दिलेली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सात वाजेर्पयत मुभा आहे. आयुक्तांनी ही मागणी लक्षात घेतात. महापालिका हद्दीतील दुकाने सात ऐवजी ९ वाजेर्पयत सुरु राहिलीत. तसेच बार आणि रेस्टारंट रात्री दहा वाजेर्पयत सुरु राहितील अशी परवानगी आयुक्तांनी दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी उद्या शनिवारपासून करण्यात येईल असे सांगितले आहे.