गौणखनिज वसुलीमध्ये सावळा गोंधळ

By admin | Published: June 30, 2017 02:45 AM2017-06-30T02:45:55+5:302017-06-30T02:45:55+5:30

भिवंडी तहसील कार्यालयात गौणखनिज वसुलीत सावळागोंधळ सुरू आहे. गौणखनिज दक्षता पथकाने विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे

Short confusion in mining recovery | गौणखनिज वसुलीमध्ये सावळा गोंधळ

गौणखनिज वसुलीमध्ये सावळा गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अनगाव : भिवंडी तहसील कार्यालयात गौणखनिज वसुलीत सावळागोंधळ सुरू आहे. गौणखनिज दक्षता पथकाने विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे ट्रक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशाशिवाय सोडण्यात येत आहेत. संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रेतीच्या चोरट्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी तहसील कार्यालयाच्या गौणखनिज दक्षता पथकामार्फत तपासणी करण्यात येते. मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी विनारॉयल्टी पकडलेले रेतीचे ट्रक तहसील कार्यालयात जमा करतात. त्याप्रमाणे दोन ट्रक १८ व १९ जून रोजी दक्षता पथकाने पकडून तहसील कार्यालयात जमा केलेल्या ट्रकचे गौणखनिजपोटी वसूल केलेली रक्कम यात तफावत आहे. संबंधित रेतीमालकांनी दंड न भरता व जमा केलेले ट्रक उपविभागीय अधिकाऱ्यांचा लेखी आदेश आल्याशिवाय सोडण्यात येत नाही, असा कायदा आहे. मात्र त्याला बगल देत भिवंडी तहसील कार्यालयातील
अधिकाऱ्यांनी दोन्ही ट्रक सोडले आहेत.
तहसीलदार शशिकांत गायकवाड तीन दिवस पुण्याला प्रशिक्षणला गेले असताना हा प्रकार घडला. विनारॉयल्टी रेतीचा ट्रक सोडणारे निवासी नायब तहसीलदार संदीप आवारी यांची या प्रकरणी चौकशी करून त्यांच्यासह रेतीमाफियांवर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी महादेव कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनीष भोईर यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानीला आळा बसेल अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Short confusion in mining recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.