डॉ. श्रीकांत शिंदे यांचे योगदान काय असा प्रश्न मतदात्यांनी विचारावा का?, आनंद परांजपे यांचा सवाल

By अजित मांडके | Published: March 13, 2024 04:43 PM2024-03-13T16:43:38+5:302024-03-13T16:44:41+5:30

असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

Should the voters ask what is the contribution of Dr Srikant Shinde?, asked Anand Paranjape | डॉ. श्रीकांत शिंदे यांचे योगदान काय असा प्रश्न मतदात्यांनी विचारावा का?, आनंद परांजपे यांचा सवाल

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे योगदान काय असा प्रश्न मतदात्यांनी विचारावा का?, आनंद परांजपे यांचा सवाल

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुकदर्शक न बनता आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय ? बारामतीत पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करु नका, सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे ? मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते ? त्यांना मतदान करताना कल्याणच्या जनतेने असे म्हणायचे का ? अशाप्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारु शकते. तसेच शिवराळ विजय शिवतारे यांच्याविरोधात ते कोणती कारवाई करणार आहेत ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

राज्यात महायुतीच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात असतांना स्थानिक पातळीवर मात्र महायुतीत बिघाडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन पुन्हा एकदा अनेक आरोप केले.  एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसºयांदा पंतप्रधान बनविण्यासाठी माननीय भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सन्मान करतो, आणि त्याही पलिकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान आहे, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे.  मुख्यमंत्री  शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. की, निष्ठेची व्याख्या काय ? महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मयार्दा बाळगलेली आहे. पण गेले दोन दिवसापासून शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतारे हे राष्ट्रवादी नेत्यांचा अपमान करत आहेत. राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळावर आघात करीत आहेत. परंतु मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत. त्यांना  समज देखील देण्यात आलेली आहे की नाही हे देखील महाराष्ट्राला माहित नाही. शिंदे यांनी सांगावे विजय शिवतारे यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार ? कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविणार, अशाप्रकारची भूमिका असू शकत नाही. स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. एकीकडे म्हणायचे पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही. एकीकडे म्हणायचे सुनेत्राताई पवार यांचे काय सामाजिक कार्य आहे की त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे ? असा देखील त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने असा प्रश्न विचारला पाहिजे होता का ? की डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान होते त्यांना मतदान करताना ? यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाचाळवीर विजय शिवतारेंसारख्या शिवराळ नेत्यांवर  कोणती कारवाई करणार ? असा सवाल परांजपे यांनी केला आहे.

Web Title: Should the voters ask what is the contribution of Dr Srikant Shinde?, asked Anand Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.