ठाण्यातील विवियाना मॉलमधील पॉसम शोमध्ये पाळीव प्राणी बनले शो स्टॉपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 03:42 PM2018-11-20T15:42:00+5:302018-11-20T15:46:39+5:30
आबालवृद्धांनी आपापल्या आवडत्या पाळीव प्राण्यासोबत संवाद साधला आणि सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला
ठाणे : विवियाना मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या "पॉसम शो"ला मॉलच्या कोर्ट यार्डमध्ये सहभागी झालेल्या पाळीव प्राण्यांनी व त्यांच्या मालकांनी उदंड प्रतिसाद दिला. शोचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून प्राणीप्रेमी आणि पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजित केले गेले. 150हून अधिक उमेदवारांनी (पाळीव प्राण्यांनी) यात सहभाग घेतला होता. यावेळी विविध प्रजातीच्या विविध प्राण्यांनी आपापल्या प्रशिक्षणाचे व विशेष कौशल्यांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित असलेल्या आबालवृद्धांनी आपापल्या आवडत्या पाळीव प्राण्यासोबत संवाद साधला आणि सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला.
या इवेंटला चिहुआहुआ, पूडल, यॉर्कशिअर टेरियर, शी त्झू, बूलमास्टिफ आदी कुत्र्यांच्या प्रजातींचा सहभाग मोठा होता. यानंतर, लॅब्रेडॉर, गोल्डन रिट्रायव्हर आणि जर्मन शेफर्ड या प्रकारातील कुत्र्यांची संख्याही मोठी होती. पाळीव प्राणी हा आपल्या समाजाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहेत, हे लक्षात घेऊन विवियाना मॉलने पाळीव प्राणी आणि पाळीव प्राणी मालकांसाठीच्या अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. मालक आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी काही खास खेळांचेही आयोजन केले गेले. याशिवाय, सोव्हरेन डॉग ट्रेनिंग स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप लाड यांनी यावेळी पाळीव प्राण्यांसाठीच्या आज्ञाधारकता प्रशिक्षणाबाबतचा खास डेमो येथे सादर केला. बऱ्याच पाळीव प्राण्यांना विशेष अशा क्युरेटेड ब्रंच ट्रीट्जचा आस्वाद दिला जात असल्याचेही या कार्यक्रमात दिसून आले. कार्यक्रमाबाबत बोलताना श्रीमती रिमा प्रधान, मार्केटिंग वी.पी., विवियाना मॉल म्हणाल्या, "सामान्यत: पाळीव प्राणी घराकडे किंवा पालक घरांमध्ये परत जातात किंवा मालक घरात नसताना घराची काळजी घेतात. विवियाना मॉलच्या 'पॉसम शो'मुळे पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांना ताजेतवाने करण्यासाठी एकत्रित वेळ घालवण्याचा एक उत्तम मंच मिळाला. ही संधी शहरी आयुष्यात जगताना फारच कमी वेळा मिळते. शिवाय, केवळ खरेदी करण्याव्यतिरिक्त, आम्ही विवियाना मॉलमध्ये नेहमी आमच्या ग्राहकांसाठी विशेष अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. हा उपक्रम हा त्यातलाच एक भाग आहे." त्याचप्रमाणे नितीन दिवेकर, फाउंडर, लिविंग ड्रीम्स म्हणाले, सर्वसाधारणपणे लोक स्वत:ला शिक्षित करू शकतात आणि पाळीव प्राणी आणि त्यांचे मालक यांच्याशी संवाद साधता येतो, अशा अनेक संधी अशाप्रकारच्या विविध इवेंट्समधून निर्माण होतात, याची आम्हाला खात्री आहे. पाळीव प्राण्यांना कसे सांभाळावे, याविषयी अशा प्रकारच्या इवेंट्समधून तज्ञांचा सल्ला घेता येतो, पाळीव प्राण्यांच्या मालकांना याविषयी माहिती मिळू शकते. पॉसम शोच्या यंदाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी विवियाना मॉलशी भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये पॉसम शोचे पहिले सत्र यशस्वीरित्या पार पडले. त्यावेळी या उपक्रमाने पाळीव प्राण्यांच्या व त्यांच्या मालकांच्या मनात दीर्घकालीन छाप पाडली. या शोच्या दुसऱ्या आवृत्तीत पाळीव प्राण्यांचा आणखी मोठा प्रतिसाद दिसून आला. यावेळी केवळ सहभागींची संख्याच वाढली नाही तर आमच्या चार पायांच्या मित्रांना प्रेमळ घरेही मिळाली. रॅम्पवर चालणारे, चांगल्या कपड्यांत नटलेले पाळीव प्राणी पाहणे ही सर्वांसाठीच आनंददायी संधी होती.