श्रद्धा लाड मृत्यू प्रकरण; ती अन आत्महत्या; करूच शकत नाही! : मैत्रीणींचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:02 AM2017-09-04T03:02:06+5:302017-09-04T03:03:20+5:30
पाचपाखाडीतील मानसोपचार तज्ज्ञ आणि स्कूल नर्सरीच्या संचालिका श्रद्धा लाड यांच्या हत्येचे कारण २४ तासांनंतरही स्पष्ट झाले नाही. परंतू, त्या आत्महत्या करतील याच्यावर त्यांच्या नातेवाईकांसह मैत्रिणींना विश्वास बसलेला नाही.
ठाणे : पाचपाखाडीतील मानसोपचार तज्ज्ञ आणि स्कूल नर्सरीच्या संचालिका श्रद्धा लाड यांच्या हत्येचे कारण २४ तासांनंतरही स्पष्ट झाले नाही. परंतू, त्या आत्महत्या करतील याच्यावर त्यांच्या नातेवाईकांसह मैत्रिणींना विश्वास बसलेला नाही. आत्महत्येपूर्वी त्यांनी काहीही लिहून ठेवले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मूळ साताºयातील कोरेगाव येथे राहणाºया श्रद्धा (४२) यांचा १९९७ साली दिलीप लाड (५०) यांच्याशी विवाह झाला. दिलीपही मूळ पाटणचे असून, लग्नानंतर काही वर्षांपासून ते ठाण्यातील पांचपाखाडी येथे वास्तव्यास आहेत. त्याच परिसरात दिलीप यांचा भाऊ राहतो. दिलीप हे २०१३ मध्ये कामानिमित्त अमेरिकेला गेले होते. तसेच पुन्हा: ते गणपतीनंतर कामानिमित्त दुबईला काही वर्षांसाठी जाणार होते. पतीच्या दुबईला जाण्यालाही त्यांचा विरोध नव्हता. लाड दाम्पत्याला दोन मुले असून, श्रद्धा या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. तसेच १२ वर्षांपासून त्या लहान मुलांची नर्सरी चालवत होत्या. श्रद्धा यांनी त्यांच्या भावजईला साताºयात नर्सरी सुरू करून दिली होती.
काही दिवसांपासून श्रद्धा यांना ताप येत असल्याने त्या यंदा गावी गणपतीला गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत दोन मुले आणि दिलीप यांच्या चुलतभावाची मुलगी घरी होती. शनिवारी दुपारी श्रद्धा या आपल्या रुममध्ये आराम करण्यासाठी जात असल्याचे सांगून आत गेल्या. सायंकाळी त्यांच्याकडे घरकाम करणारी बाई आल्यावर त्यांच्या पुतणीने त्यांना आवाज दिला. मात्र, त्यांच्या आवाजाला प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाला धक्का दिल्यावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
श्रद्धा यांनी आजारी असल्याने गावावरून आईला बोलविले होते. मात्र, गणपती झाल्यानंतर येते असे आईने त्यांना सांगितले होते. श्रद्धा यांचे सासरी आणि माहेरी चांगले संबंध होते. नेहमीच हसमुख आणि मनमिळावू असणाºया श्रद्धा या नेहमीच प्रत्येकाची समजू काढत. ती आत्महत्या करेल यावर विश्वास बसत नाही. असे त्यांच्या नातेवाईक - त्यांच्यासोबत काम करणाºया तसेच त्यांच्या काही मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात केली असून, शवविच्छेदनाच्या अहवालात श्रद्धा लाड यांनी आत्महत्या केल्याचे नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर करीत आहेत.