श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन 

By नितीन पंडित | Published: January 22, 2024 04:45 PM2024-01-22T16:45:44+5:302024-01-22T16:47:00+5:30

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त देशभर उत्साहाचे वातावरण असून,ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते.

Shri ram mandir inauguration ceremony organizing a special program in the presence of the union minister of state | श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन 

श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन 

नितीन पंडित, भिवंडी : अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त देशभर उत्साहाचे वातावरण असून,ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते.केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी शहरातील पद्मानगर येथील श्री राम मंदिर प्रांगणात श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली.कपिल पाटील फाऊंडेशन चे सुमित पाटील यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार महेश चौघुले,भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील, माजी अध्यक्ष संतोष शेट्टी यांसह शेकडोंच्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा अनुभवला.त्यानंतर आरती सोहळ्यात सर्वांनी सहभाग घेतला.

आपल्या पूर्वजांनी मुघल काळात अन्याय सहन होताना व मंदिर उद्ध्वस्त होताना पाहिली आपण भाग्यवान आहोत की प्रभू श्री रामाचे मंदिर उभे राहत असताना त्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्या पिढीला लाभले.५०० वर्षांची आपली प्रतीक्षा संपली आहे.भारताचा जेव्हा केव्हा नवा धार्मिक इतिहास लिहिला जाईल.त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे,उत्साह आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी दिली. या निमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

Web Title: Shri ram mandir inauguration ceremony organizing a special program in the presence of the union minister of state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.