शिंदेंविरुद्ध आयएफएस असोसिएशन मैदानात; वनअधिकाऱ्यांवर राख फेकणे पडणार महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 12:55 AM2018-11-22T00:55:23+5:302018-11-22T00:56:44+5:30

वनविभाग अधिका-याच्या अंगावर राख फेकण्याचे प्रकरण आता चांगलेच तापण्याचे संकेत दिसत आहे.

shrikant Shinde against IFS Association | शिंदेंविरुद्ध आयएफएस असोसिएशन मैदानात; वनअधिकाऱ्यांवर राख फेकणे पडणार महागात

शिंदेंविरुद्ध आयएफएस असोसिएशन मैदानात; वनअधिकाऱ्यांवर राख फेकणे पडणार महागात

Next

ठाणे : वनविभाग अधिका-याच्या अंगावर राख फेकण्याचे प्रकरण आता चांगलेच तापण्याचे संकेत दिसत आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) असोसिएशनने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून खा. श्रीकांत शिंदेंवर कारवाईची मागणी केली आहे. शिंदे यांच्यावर कोणती कलमे लावण्यात यावी, याची यादीच असोसिएशनने या पत्रात दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण शिंदे यांना चांगलेच जड जाण्याची चिन्हे आहेत.
अंबरनाथ येथील मांगरूळ येथे वृक्षांची जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोपरी येथील वनविभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. शिवसैनिकांनी वनविभागाच्या कार्यालयात घुसून अधिकाºयांच्या अंगावर राख फेकून झाडांच्या कुंड्याही टाकल्या होत्या. शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर वनविभागाने एका अधिकाºयाला निलंबितदेखील केले होते. मात्र झाडे जाळणाºया समाजकंटकांवर कारवाई प्रस्तावित असताना शिंदे यांनी असा प्रकार केल्याने कर्मचारी आणि अधिकाºयांनी मंगळवारी कोपरी कार्यालयाबाहेर आंदोलन करून, शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही, तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर आले असून शिंदे यांच्यावर कारवाईसाठी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशनने थेट मुख्य सचिवांना पत्र दिले आहे.

कलमांची लांबलचक यादी
असोसिएशनने दिलेल्या पत्रामध्ये शिंदे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या जवळपास २५० लोकांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याबरोबर चुकीचे वर्तन केले असल्याचे नमूद केले आहे. वनअधिकारी कर्तव्यावर असताना अशा प्रकारे वर्तन करणे चुकीचे असून यामुळे अधिकाºयांचे मनोधैर्य खचले असल्याचे या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कलम १२० बी, १४१, १४३, १४५, १४६, १४७, १४९, १५, १८६, १८९, ३१२, २३२, २४९, २५०, ३५१, ३५३ अशा कलमांची यादीच या पत्रामध्ये दिली आहे. या पत्रावर आता मुख्य सचिव काय भूमिका घेतात, यावर या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.

केवळ स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आमच्यावर ३५३ अंतर्गत कारवाई करण्याआधी ज्या फॉरेस्ट अधिकाºयांमुळे वृक्षांची कत्तल झाली, त्यांच्यावर ३०२ अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचा दावा केला जात आहे. परंतु, त्यातील एक कोटी वृक्ष तरी जगले आहेत का? यात खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वास येत आहे.
- श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा

Web Title: shrikant Shinde against IFS Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे