वारंवार वीज खंडित होण्यामुळे डोंबिवलीकर त्रस्त- श्रीकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 07:16 PM2020-01-07T19:16:39+5:302020-01-07T19:17:17+5:30
शिवसैनिक, महावितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक
डोंबिवली: महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळाच्या अखत्यारीत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथ परीसरात वारंवार विजपुरवठा खंडीत होण्याच्या नागरीकांच्या तक्रारी वरचेवर येत असतात याची दखल घेउन खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज महावितरणच्या सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक आयोजीत केली होती.
सदर बैठकीस ज्येष्ठ नगरसेवक श्री. विश्वनाथ शिंदे, नगरसेवक श्री. राजेश मोरे व नगरसेवक श्री. दिपेश म्हात्रे तर महावितरण कंपनी तर्फे विभागीय संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य कार्यकारी अभियंता श्री. दिनेश अग्रवाल, अधिक्षक अभियंता श्री. सुनिल काकडे, श्री. पेटकर, श्री. प्रविण परदेशी, कल्याण पूर्वचे कार्यकारी अभियंता श्री. धावड, अतिरीक्त कार्यकारी अभियंता श्री. कलढोण, व इतर अधिकारी हजर होते.
सदर बैठकी दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या प्रयत्नामुळे एकात्मिक उर्जा विकास योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना इत्यादी योजनेतून सुमारे १२० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मीळाली आहे त्या कामांची पूर्तता कशी व कधी होणार आहे याची विचारणा मा. खासदार महोदयांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली.
याबाबत बोलताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर कामांसाठी महापालिकेकडून रस्ता खोदून पूर्ववत करण्याच्या पोटी महापालिकेकडून परवानगीसाठी अर्ज केला असून त्याला परवानगी मीळताच सदर कामे चालू करून हि कामे मे-जून पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मा. महापौर सौ. विनिता राणे व आयुक्त मधुकर बोडके यांना फोन वरून सदर कामास तातडीने मंजुरी द्यावी असे आदेश दिले.
या निधीतून कल्याण पूर्व येथील मेट्रो मॉल येथे व अंबरनाथ पश्चीम येथील मोहनपूरम जवळ नविन उपकेंद्रे, २७९ नविन ट्रांस्फॉर्मर्स, २२२ जुन्या ट्रांस्फॉर्मर्स ची क्षमता वाढवीणे १५६ किमी लांबीची उच्च दाबाची व लघु दाबाची लाईन टाकणे, झंपर बदलणे व यासंबंधाने करावयाची कामे करण्यात येणार आहेत. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अत्यल्प होइल अशी ग्वाही श्री. अंकुश नाळे यांनी दिली.