"महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल"; श्रीकांत शिंदेंची टीका

By पंकज पाटील | Published: May 7, 2023 04:55 PM2023-05-07T16:55:33+5:302023-05-07T16:57:33+5:30

अंबरनाथ मलंगड परिसरामध्ये एका कार्यक्रमानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

shrikant shinde slams mahavikas aghadi over vajramooth sabha | "महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल"; श्रीकांत शिंदेंची टीका

"महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल"; श्रीकांत शिंदेंची टीका

googlenewsNext

अंबरनाथ : महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल, असे म्हणत महाविकास आघाडीचे नेते आधी आमच्यावर टीकाटिप्पणी करत होते, आता एकमेकांवर करतायत, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

अंबरनाथ मलंगड परिसरामध्ये एका कार्यक्रमानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडीचे नेते दररोज जी वज्रमूठ दाखवण्याचा प्रयत्न करतायत, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी सुरू आहे. आतमध्ये महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करतात. आधी आमच्यावर करत होते, आता एकमेकांपर्यंत करायला लागले आहेत.

दुसरीकडे लोकांच्या मनातले सरकार सध्या आले असून गेल्या दहा महिन्यात वेगवान निर्णय आणि वेगवेगळ्या पॉलिसी आणण्याचे काम या सरकारने केले. गेल्या अडीच वर्षातले सरकार मात्र सुस्त होते आणि गेल्या अडीच वर्षात काहीच काम झाली नव्हती. तेच काम आम्ही गेल्या दहा महिन्यात करून दाखवले. आता येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभा रद्द केल्या असून त्यामुळे ही वज्रमूठ राहते की नाही? हे आपणही पहा, लोकही पाहत आहेत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. तर अजित दादा तुमच्याकडे येणार आहेत का? असे त्यांना विचारले असता, मी एक छोटा कार्यकर्ता असून तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. यामध्ये मी जास्त बोलू शकत नाही. अजितदादा इकडे जातात, तिकडे जातायत, अशा बातम्या मीडियावर दाखवत असून अजित दादांना तरी सांगू द्या ते कुठे जातायत, असे म्हणत त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले. 

Web Title: shrikant shinde slams mahavikas aghadi over vajramooth sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.