पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:03 PM2021-01-19T21:03:21+5:302021-01-19T21:03:40+5:30

Thane : डॉ. श्रीनिवास हे प्रिटिंग व्यवसायात कार्यरत होते. स्वाध्याय परिवाराचे वैश्विक कार्य सांभाळणाऱ्या धनश्री दीदींना त्यांनी मोलाची आणि खंबीर साथ दिली.

Shrinivas Talwalkar, son-in-law of Padma Vibhushan Pandurangshastri Athavale passed away | पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

googlenewsNext

ठाणे : स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांचे जावई व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे यजमान डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे सोमवारी अहमदाबाद येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे  कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

माटुंगा येथील हिंदू कॉलनीत त्यांचे निवासस्थान होते. अहमदाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत  मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारसाठी मंगळवारी तत्वज्ञान विद्यापीठात आणण्यात आले. त्यांच्या निधनाने स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे. 

डॉ. श्रीनिवास हे प्रिटिंग व्यवसायात कार्यरत होते. स्वाध्याय परिवाराचे वैश्विक कार्य सांभाळणाऱ्या धनश्री दीदींना त्यांनी मोलाची आणि खंबीर साथ दिली. स्वाध्याय परिवारात ते आदरणीय आणि लाडके व्यक्तीमत्व होते हिंदू कॉलनीतील तळवलकर तसेच रहेजा इस्पितळाचे संस्थापक सदस्य असलेले कै.डॉ. नीळकंठ तळवलकर यांचे ते सुपूत्र होते.

Web Title: Shrinivas Talwalkar, son-in-law of Padma Vibhushan Pandurangshastri Athavale passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे