जिल्हाधिकारी कार्यालयासह बांधकाममध्ये शुकशुकाट; जि.प. संमिस्त्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:24 PM2018-08-07T17:24:40+5:302018-08-07T17:33:48+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आजच्या पहिल्या दिवशी तरी संपात सहभागी दिसून आले. कार्यालयीन वेळेत सकाळी बहुतांशी कर्मचारी आले. त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर गर्दी करून घोषणा बाजी केली.

Shukushkat in the construction of the Collector Office; Zip Comic Response | जिल्हाधिकारी कार्यालयासह बांधकाममध्ये शुकशुकाट; जि.प. संमिस्त्र प्रतिसाद

एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर गर्दी करून घोषणा बाजी केली

Next
ठळक मुद्देपहिल्या दिवशी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासह, तहसिल आॅफीस आणि बांधकाम विभागात मात्र कर्मचा-यां अभावी शुकशुकाटठाणे जिल्हा परिषदेत कर्मचा-यांचा संमिस्त्र प्रतिसाद जिल्हा परिषदेचे कर्मचारी बुधवारीपासून संपात सहभागी नसणार


ठाणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषद कर्मचा-यांनी तीन दिवशीय संपाची घोषणा केली. त्यातील मंगळवारच्या पहिल्या दिवशी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासह, तहसिल आॅफीस आणि बांधकाम विभागात मात्र कर्मचा-यां अभावी शुकशुकाट पहायला मिळाला. तर शिक्षण विभागासह सामान्य प्रशासन, समाजकल्याण आदी विभागात मात्र कर्मचारी उपस्थिती आढळली, यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचा-यांचा संमिस्त्र प्रतिसाद मिळाला आहे. या प्रमाणेच शहरासह जिल्हह्यातील बहुतांशी शाळांमधील शिक्षकांचा संपात सहभाग आढळून आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आजच्या पहिल्या दिवशी तरी संपात सहभागी दिसून आले. कार्यालयीन वेळेत सकाळी बहुतांशी कर्मचारी आले. त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर गर्दी करून घोषणा बाजी केली. तहसिलदार कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागातही ही स्थिती आढळून आली. राजपत्रित अधिकारी मात्र कार्यालयांमध्ये आढळून आले. या संपकरी कर्मचा-यांचे नेतृत्व येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी केले. पुढील दोन दिवसही कर्मचा-यांचा असाच प्रतिसाद मिळणार असल्याची अपेक्षा गव्हाळे यांनी केली. तर आजच्या पहिल्या दिवशीही संपात संमित्र प्रतिसाद दिलेले जिल्हा परिषदेचे कर्मचारी बुधवारीपासून संपात सहभागी नसणार, ते नेहमी प्रमाणे कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे ओंकार प्रणित जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे संपर्क सचिव शरद भिडे यांनी सांगितले.

Web Title: Shukushkat in the construction of the Collector Office; Zip Comic Response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.