‘महावितरण’चे शटडाउन : कल्याण-डोंबिवली होणार घामाघूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:15 AM2018-05-11T06:15:33+5:302018-05-11T06:15:33+5:30
पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे.
कल्याण - पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे. मात्र, ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ‘महावितरण’ने दिलगिरी व्यक्त केली आहे.
कल्याणमधील बारावे उपकेंद्रातून बारावे आणि गोदरेज हिल फीडरवरून होणारा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान बंद राहणार आहे. याअंतर्गत येणाºया गोदरेज पार्क, शंखेश्वर प्रेसिडेन्सी, बारावेगाव, नीरज सिटी, मंत्री लॅक्शन, टावरीपाडा, खडकपाडा, गोदरेज हिल, राधानगर ते गोल्डन पार्क आदी ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होईल.
खडकपाडा फीडरवरून होणारा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान बंद राहील. त्यामुळे साई चौक, साई संकुल, चंद्रेश गॅलेक्सी, राधानगर, वायलेनगर, महावीरनगरी, तारांगण, मोहन हाइट्स, मोहन प्राइड, मोहन पॅराडाइज, वनश्री, गोल्डन पार्क, बेतुरकरपाडा, फ्लॉवर व्हॅली, हीना पार्क, मनीषानगर या ठिकाणी वीज नसेल. ‘तेजश्री’ उपकेंद्रातून कर्णिक रोड, रामदासवाडी या फीडरवर होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ बंद राहणार आहे.
कर्णिक रोड फीडर भागातील ठाणगेवाडी, साई मंदिर, रामबाग लेन नं. ४, गुरुद्वारा, कर्णिक रोड, कमिशनर बंगला तर रामदासवाडी फीडरवरील दत्तात्रेय कॉलनी, भवानीनगर, संपदा रुग्णालय, आरटीओ, रामदासवाडी येथे वीज नसेल.
मोहने उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ बंद राहणार असल्याने मोहने ३ फीडरवरील उच्चदाब ग्राहक ‘स्टेम’ वॉटर सप्लायचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
सात तास वीज नाही
डोंबिवलीतील एमआयडीसी, आनंदनगर, बाजीप्रभू या अखत्यारीतील गोग्रासवाडी, कºहाडे ब्राह्मण सभागृह, डोंबिवली पश्चिम, स्टार कॉलनी, महावीरनगर, गावदेवी मंदिर, पांडुरंगवाडी, नांदिवली, पी अॅण्ड टी कॉलनी, गांधीनगर, ठाकुर्ली या परिसरात शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २, असे तीन तास तर उमेशनगर, नवापाडा याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा सात तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
उद्याही दुरुस्तीचे काम
देखभाल दुरुस्तीचे काम काही भागांमध्ये शनिवारीही केले जाणार आहे. दुर्गाडी आणि वल्लीपीर उपकेंद्रातून बंदररोड फीडरवर होणारा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे दूधनाका, रेतीबंदर परिसर, कोळीवाडा ते वलीपीर मशिदीपर्यंत त्या कालावधीत वीज नसेल. तर, पत्रीपूल फीडरवरील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत बंद राहील. यात पत्रीपुलाजवळील परिसर, वल्लीपीर रोड, वल्लीपीर तलावाचा विभाग येतो.