मेडिकल दुकानाचे शटर उचकटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:48+5:302021-06-19T04:26:48+5:30
------------------------------------ ‘वंचित’ची निदर्शने उडी डोंबिवली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी ...
------------------------------------
‘वंचित’ची निदर्शने उडी
डोंबिवली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहरातर्फे शुक्रवारी इंदिरा चौकात निदर्शने करण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांच्या लढ्यात दि.बा. यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. त्यामुळे विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी भूमिका या वेळी घेण्यात आली. मिलिंद साळवे, बाजीराव माने, सुरेंद्र ठोके, राजू काकडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. या मागणीचा योग्य विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी रामनगर पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
---------------------------------------
कोरोनाचे नवे ७९ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत शुक्रवारी नवीन ७९ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या एक हजार ३९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३५ हजार २२१ रुग्ण आढळून आले आहेत, तर एक लाख ३१ हजार ३४३ रुग्ण बरे झाले आहेत.
-------------------------------------------
आक्रोश आंदोलन
कल्याण : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आदी मागण्यांसाठी महात्मा फुले समता परिषद, कल्याण-डोंबिवली शहरातर्फे शुक्रवारी आक्रोश आंदोलन छेडण्यात आले. पश्चिमेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते कल्याण तहसील कार्यालय, असा मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
-------------------------------------------
धोकादायक झाड पाडले
कल्याण : पूर्वेतील नेतिवली, मेट्रो मॉलच्या शेजारी मुख्य रस्त्यावर असलेले धोकादायक झाड पडण्याच्या मार्गावर होते. हे झाड मुख्य रस्त्यावर असल्याने त्याच्यामुळे अपघात होऊन प्राणहानी होण्याची शक्यता होती. याची माहिती मिळताच अग्निशमन दल विभाग आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झाड तोडले.
-----------------------