आजारी झालेल्या परिचारिकेची पैशांसाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:30 AM2020-04-30T02:30:36+5:302020-04-30T02:30:43+5:30

रुग्णांची सेवा करणाऱ्या या कोरोनायोद्धीकडे स्वत:वरील उपचाराचे बिल देण्याएवढेही पैसे नव्हते.

Sick nurse wandering for money | आजारी झालेल्या परिचारिकेची पैशांसाठी भटकंती

आजारी झालेल्या परिचारिकेची पैशांसाठी भटकंती

googlenewsNext

ठाणे : ज्या परिचारिकेने स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त र ग्णांची सेवा केली, तिच्यावरच कोरोनाग्रस्त होण्याची वेळ आली. हे संकट एवढ्यावरच थांबले नाही, तर उपचाराचे भले मोठे बिलही तिच्या हातात दिले. रुग्णांची सेवा करणाऱ्या या कोरोनायोद्धीकडे स्वत:वरील उपचाराचे बिल देण्याएवढेही पैसे नव्हते. परंतु, माणुसकी नसलेल्या रुग्णालयाने तेही माफ करण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेर इतर कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून अनामत रक्कम भरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या रुग्णालयास दिलेल्या सुविधा काढून नियमभंग केल्याप्रकरणी त्याच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
लोकमान्यनगर भागात राहणारी एक महिला ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात वैद्यकीय कर्मचारी या पदावर काम करते. दुर्दैवाने रुग्णालयात सेवा बजावत असतानाच कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिलाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे महापालिकेने घोषित केलेल्या ठाणे पाचपाखडी येथील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. गेले चार दिवस या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच तिला रुग्णालय प्रशासनाने अनामत रक्कम म्हणून २४ हजार रुपये भरण्यासाठी सांगितले. पैसे नसल्याने काही दिवसांनी बंदोबस्त करून भरते असे तिने सांगितले. मात्र, रुग्णालय प्रशासन रोज तिच्याकडे अनामत रक्कम भरण्यासाठी तगादा लावत असल्याने या अवस्थेतही कोरोनाबाधित परिचारिकेने तिच्या मैत्रिणींकडून कर्ज काढून काहींकडून वर्गणी जमा करून रुग्णालयाने मागितलेली अनामत रक्कम भरली. मात्र, कोरोनाबाधित रुग्णाला सगळ्यात जास्त मानसिक आधाराची गरज असताना पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावणे हे एकाप्रकारे रु ग्णाचा छळच असल्याचे कामगार नेते रवी राव यांचे म्हणणे आहे. परिचारिकेवर उपचार सुरू असून हा खर्च लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे.
>रुग्णालयाने लाटल्या अनेक सुविधा
ज्या रु ग्णालयात या परिचारिकेचे उपचार सुरू आहे, त्या रु ग्णालय व्यवस्थापकांनी ठाणे महानगरपालिकेकडून अनेक सुविधा लाटल्या आहेत. ट्रस्ट दाखवून महापालिका आणि सरकारकडून सवलती मिळविल्या आहेत. गरिबांसाठी या रु ग्णालयात २० टक्के बेड देणे बंधनकारक असतानाही रु ग्णालय व्यवस्थापकांकडून नियमभंग केला जात आहे. एकीकडे जनसेवा करणाºया कर्मचाºयांवर जनता फुलांचा वर्षाव करून आभार व्यक्त करत आहेत. दुसरीकडे खासगी रु ग्णालये त्यांची लूट करीत आहेत, असा आरोप या रु ग्णालय प्रशासनावर होत आहे. उपचार सुरू असलेल्या या परिचारिकेला रोज १० हजार रु पये जमा करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे या आजारातून कसे बरे व्हायचे, असा सवाल तिच्यासमोर उभा राहिला आहे.
>... तर आरोग्य कर्मचारी
बहिष्कार टाकतील
मुंबई महानगरपालिका अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था करीत आहे. रु ग्णालयात त्यांच्यावर मोफत उपचार होत आहेत. ठाण्यातदेखील अत्यावश्यक सेवा देणाºयांना या सुविधा मिळायला हव्यात. ठाणे महानगरपालिकेच्या परिचारिकेचा पैशांसाठी छळ करणाºया रु ग्णालयावर कारवाई व्हावी. अन्यथा, युनियनचा एकही आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर हजर होणार नाही.
- रवी राव, अध्यक्ष, म्युनिसिपल लेबर युनियन

Web Title: Sick nurse wandering for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.