सिग्नल शाळेत मुक्काम पोस्ट तीन हात नाकाचे प्रकाशन, रस्त्यावरील ताऱ्यांना भेटले सिनेसृष्टीतील तारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:10 PM2018-12-24T16:10:26+5:302018-12-24T16:32:57+5:30

सिग्नल शाळेत मुक्काम पोस्ट तीन हात नाकाचे प्रकाशन मराठी सिने तारकांच्या उपस्थितीत पार पडले. 

Signal school stay at the post of three hand nose, stars on the street meet stars | सिग्नल शाळेत मुक्काम पोस्ट तीन हात नाकाचे प्रकाशन, रस्त्यावरील ताऱ्यांना भेटले सिनेसृष्टीतील तारे 

सिग्नल शाळेत मुक्काम पोस्ट तीन हात नाकाचे प्रकाशन, रस्त्यावरील ताऱ्यांना भेटले सिनेसृष्टीतील तारे 

Next
ठळक मुद्देसिग्नल शाळेत मुक्काम पोस्ट तीन हात नाकाचे प्रकाशनरस्त्यावरील ताऱ्यांना भेटले सिनेसृष्टीतील तारे कंटेनर वर्ग ते मॉडेल स्‍कुल असा अडीच वर्षाचा विलक्षण प्रवास 

ठाणे : भिक ते शिक, पुलाखाली भुतं ते रोबेटिक, कंटेनर वर्ग ते मॉडेल स्‍कुल असा अवघ्‍या अडीच वर्षाचा विलक्षण प्रवास मुक्काम पोस्ट तीन हात नाका या विषेशांकाच्या माध्यमातून सिग्नल शाळेत उलगडला. या कार्यक्रमाप्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील सिनेतारे उपस्थित होते .

मुंबई, ठाणे परिसरातील जवळपास एक लाख मुले आजही रस्त्यावरील जीवन जगत आहेत. या मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणणणयासाठी काही तरी मॉडेल असावे असा विचार करून गेली अडीच वर्षे सिंगल शाळेच्या उपक्रमात विविध प्रयोग करण्यात येत होते. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या या प्रयत्नाला आत यश मिळत असुन मुख्यमंत्र्यांनी देखील सिग्नल शाळेच्या या प्रयोगाला राज्यभर राबविण्याबाबाबत चाचपणी करण्याची भुमिका अधिवेशनात मांडली आहे. या पार्शवभूमीवर सिग्नल शाळा उपक्रमाचा पहिल्‍या दिवसांपासुनचा प्रवास शब्‍दबध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न मुक्‍काम पोस्‍ट सिग्‍नल शाळा या विशेषांकाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशनसिग्‍नल शाळेत संपन्न झाले. अभिजित पानसे , अवधुत गुप्‍ते, अंकुश चौधरी, अजित परब, अतुल परचुरे, अमेय खोपकर, विजु माने, शिरिष लाटकर, जयंत पवार आदी सिनेकलावंत दिग्‍दर्शक या अंकाच्‍या प्रकाशनाला उपस्थित होते. उपायुक्‍त मनिष जोशी यांच्‍यासह डॉ. सुबोध मेहता, डॉ मेधा भावे यांच्‍यासह विविध क्षेत्रातील मान्‍यवर व सिग्‍नल शाळेच्‍या प्रवासात गेल्‍या अडिच वर्षांत ज्‍यांनी साथ दिली असे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मुक्‍काम पोस्‍ट तीन हात नाका या अंकाचे मानद संपादकत्‍व अभिजित पानसे यांनी भुषविले असुन वीजु माने, शिरिष लाटकर, जयंत पवार, डॉ विजया वाड, कौशल इनामदार, कुशल बद्रिके हे अंकाचे अथिती संपादक आहेत. आरती पवार परब या अंकाच्‍या संपादीका असुन प्रियंका लबदे यांनी संपादन सहाय्य केले आहे. अंकात शाळेत राबविलेले विविध उपक्रम आणि शैक्षणिक प्रयोगासं‍बधित जवळपास २० लेख आहेत. याचसोबत सिग्‍नल शाळेच्‍या मुलांच्‍या कविता, निबंध आणि चित्र देखील आहेत.

Web Title: Signal school stay at the post of three hand nose, stars on the street meet stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.