शहर काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:12+5:302021-07-17T04:30:12+5:30

ठाणे : घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याचाच रोष सर्वसामान्य जनतेमध्ये ...

Signature campaign against inflation on behalf of the City Congress | शहर काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात स्वाक्षरी मोहीम

शहर काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात स्वाक्षरी मोहीम

Next

ठाणे : घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याचाच रोष सर्वसामान्य जनतेमध्ये असून, बेरोजगारीदेखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याच्या निषेधार्थ ठाणे काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम ठाण्यातील बाबूभाई पेट्रोलपंप येथे राबविण्यात आली. ठाणे शहर ब्लॉक अध्यक्ष व असंघटित कामगार काँग्रेसचे ठाणे विभाग अध्यक्ष संदीप संभाजी शिंदे, धर्मवीर मेहरोल, बाबू यादव, प्रकाश मांडवकर, दिलिप भोईट, जानबा पाटील, भारती जाधव, हेमंत इंगळे, शब्बीर चाऊस, अर्चना गांगुर्डे, संजय (बाळा) घाग, सुजय पाटील व इतर पदधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Signature campaign against inflation on behalf of the City Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.