भिवंडीतील गोदामातून एक कोटी २३ लाखांची चांदीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 06:47 PM2022-04-23T18:47:20+5:302022-04-23T18:47:30+5:30

- नितिन पंडीत  लोकमत न्यूज नेटवर्क  भिवंडी : फर्निचरच्या गोदामात साठवून ठेवलेली एक कोटी २३ लाख रुपये किंमतीची १६० ...

Silver worth Rs 1.23 crore stolen from Bhiwandi warehouse | भिवंडीतील गोदामातून एक कोटी २३ लाखांची चांदीची चोरी

भिवंडीतील गोदामातून एक कोटी २३ लाखांची चांदीची चोरी

googlenewsNext

- नितिन पंडीत
 लोकमत न्यूज नेटवर्क 

भिवंडी : फर्निचरच्या गोदामात साठवून ठेवलेली एक कोटी २३ लाख रुपये किंमतीची १६० किलो वजनाची चांदीची भांडी घरफोडी करून चोरीला गेल्याची घटना भिवंडीतील ग्रामीण भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       तालुक्यातील अंजुर फाटा वसई रोडवर असलेल्या कालवार गावाच्या हद्दीत असलेल्या शुभम इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समधील डी लुसो नावाचे फर्निचर गोदाम आहे, या गोदामात सुमारे १६० किलो वजनाची एक कोटी २३ लाख रुपये किंमतीची चांदीची भांडी साठवून ठेवण्यात आली होती. ही चांदीची भांडी अज्ञात इसमाने गोदामाचे शटर उचकटून घरफोडी करून चोरी केली आहे.  याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे करीत आहेत

Web Title: Silver worth Rs 1.23 crore stolen from Bhiwandi warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.