वाड्यात डिझेलच्या मापात पाप
By Admin | Published: March 17, 2017 05:45 AM2017-03-17T05:45:15+5:302017-03-17T05:45:15+5:30
वाडा शहरात असणाऱ्या सागर पेट्रोल पंपावर डिझेल घेतल्यानंतर एका ग्राहकाला मापात घट आल्याचे लक्षात येताच त्याच्या तक्रारीनुसार महसूल
वसंत भोईर , वाडा
वाडा शहरात असणाऱ्या सागर पेट्रोल पंपावर डिझेल घेतल्यानंतर एका ग्राहकाला मापात घट आल्याचे लक्षात येताच त्याच्या तक्रारीनुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. याबाबत अधिक तपास करून कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे.
शहरात सागर पेट्रोल पंप हा सर्वात जुना पंप आहे. दुपारच्या सुमारास असनस गावातील विठ्ठल सोमा हिरवे हे २.२५ लिटर मापाच्या एका बाटलीत डिझेल घेण्यासाठी आले असता त्यांनी १५० रुपयांचे डिझेल मागितले. त्यानुसार त्यांना २.३६ लिटर एवढा डिझेल दिल्याचे रिडींग आले. बाटली २.२५ लिटरची असताना त्यांना २.३६ लिटर डिझेल मावले कसे? असा प्रश्न त्यांच्या पडला. मापात घपला केल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांनी तक्रार केली. नायब तहसीलदार व तलाठी घटनास्थळी आले व त्यांनी पुन्हा एकदा सर्वांसमक्ष ५०० मिलीच्या पात्रात ३५० मिली रिंडींगचे डिझेल घेतले. त्यावेळी पात्रात ३२०च मिली डिझेल आल्याचे निदर्शनास आले.