उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे

By सदानंद नाईक | Published: October 7, 2022 04:50 PM2022-10-07T16:50:13+5:302022-10-07T16:52:15+5:30

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून रस्ते अरुंद व वाहनांची संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे

Sindhu Sanskriti Bhavan and parking lot in Ulhasnagar; MLA Kinikar demand to the Chief Minister | उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे

उल्हासनगरात सिंधु संस्कृती भवन व वाहनतळ; आमदार किणीकर यांचे मुख्यमंत्र्याकडे साकडे

Next

उल्हासनगर - कॅम्प नं-५ येथील शासकीय जागेवर एमएमआरडीए मार्फत सिंधू संस्कृती भवन व बहुमजली वाहनतळ उभारण्याची मागणी आमदार बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. कॅम्प नं-५ परिसरात वाहनतळ उभे राहिल्यास, शहर पूर्वेतील वाहतूक समस्या निकाली निघणार आहे.

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून रस्ते अरुंद व वाहनांची संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. तसेच सिंधू संस्कृती भवनाची मागणी जुनी आहे. वाहनतळ व सिंधी समाजाची सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सिंधी संस्कृती भवन एमएमआरडीएच्या मार्फत बांधण्याची मागणी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. कॅम्प नं-५ येथील महाराष्ट्र शासनाची मालकी असलेली सि.टी.एस. क्र.२५७९८,२५७९९ एकूण क्षेत्रफळ : २४४२.४० चौ.मी. जागेवर ब्रिटीश राजवटीत थियटर उभारण्यात आले होते. 

कालांतराने याठिकाणी धान्याचे कोठार बांधण्यात आले. सद्या ही जागा विनवापर असून याठिकाणी एमएमआरडीए मार्फत सिंधू संस्कृती भवन बांधावे. तसेच पूर्वेतील मच्छी मार्केट परिसरातील संत कवररामनगर समाज मंदिराच्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावे. अशी लेखी मागणी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शुक्रवारी शासकीय निवासस्थान वर्षा याठिकाणी भेट घेत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहनतळ व सिंधू संस्कृती भवन या दोन्हीं प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार किणीकर यांनी दिली. एका वर्षात सिंधू संस्कृती भवन व वाहनतळ एमएमआरडीएच्या निधीतून उभे राहणार असल्याचे संकेत किणीकर यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री यांनी दोन्ही प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आदेश संबंधित विभागाला दिल्याची माहिती दिली. आमदार बालाजी किणीकर यांच्या या प्रस्तावाचे सर्व शहरातून कौतुक होत आहे. 
 

Web Title: Sindhu Sanskriti Bhavan and parking lot in Ulhasnagar; MLA Kinikar demand to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.