‘साहब, जेल में सुराग है...’, खड्ड्यात सापडला मोबाइल : कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:59 AM2017-08-28T04:59:37+5:302017-08-28T04:59:53+5:30
‘साहब, जेल में सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब, जेल में सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे
कल्याण : ‘साहब, जेल में सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब, जेल में सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. जेलच्या सर्कलशेजारी खोदलेल्या खड्ड्यात काय आहे, हे तपासले असता त्यात एक मोबाइल लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
आधारवाडी कारागृहातील पाण्याच्या टाकीजवळील सर्कलशेजारीच एक खड्डा असल्याचे कारागृहातील कैदी मुरगम हरिजन याला दिसले. त्याने तातडीने ही माहिती कारागृहाचे पहारेकरी संतोष खारतोडे यांना दिली. ती त्यांनी वरिष्ठांच्या कानांवर घातली. खड्ड्यातील माहिती काढून तपासणी केली असता त्यात एका प्लास्टिकखाली पांढºया रंगाचा एक मोबाइल आढळला. त्यात बॅटरी व सीमकार्डही होते. या घटनेची तक्रार खारतोडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी मोबाइल जप्त केला आहे. सीमकार्ड कोणाच्या नावावर आहे, त्याद्वारे कोणाशी संपर्क साधण्यात आले तसेच कॉल रेकार्ड तपासले जाणार आहेत. त्यावरून त्याचा वापर कोणी कशासाठी केला, हे उघड होणार आहे.