बदलापूर प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या घरी SIT'ची तपासणी; मोबाईलसह महत्वाचे पुरावे सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 22:47 IST2024-08-24T22:22:01+5:302024-08-24T22:47:06+5:30
बदलापूर घटनेवरुन राज्यभर आरोप प्रत्यारोप सुरू आहे, या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपासही सुरू आहे.

बदलापूर प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या घरी SIT'ची तपासणी; मोबाईलसह महत्वाचे पुरावे सापडले
बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलींच्या पालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. यासाठी आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आंदोलन केले. नागरिकांच्या उद्रेकानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी SIT स्थापनेचे आदेश दिले. एसआयटीने आता तपास सुरू केला असून आज आरोपीच्या घरात तपासणी केली. यावेळी मोबाईलसह काही पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली.
'लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल पुढे काय?' राज ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा
आरोपी अक्षय शिंदेच्या घरी पोहोचली. आरोपीच्या घराला कुलूप होते. एसआयटीने कुलूप तोडून आतमध्ये पुरावा शोधला. अक्षयचा मोबाईलही ट्रेस करण्यात आला असून, त्यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीचे पथक आरोपी अक्षय शिंदेच्या घरी सुमारे ४५ मिनिटे थांबले, त्यानंतर ते परतले. तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि अक्षयच्या मोबाईल शोधला. यावेळी आरोपीही त्यांच्यासोबत होता, त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याने दोनदा लग्न केल्याचे सांगितले जात आहे. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती.
पहिल्या पत्नीली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर फक्त ४ महिन्यांनी त्याने दुसरे लग्न केले. काही दिवसांनी त्याची दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली. १६ ऑगस्ट रोजी शाळेच्या बाथरूममध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी एका दिवसानंतर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला पॉक्सो कायद्यान्वये अटक केली. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.