सहा बांगलादेशींकडे आधार कार्ड मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 02:25 AM2018-10-14T02:25:33+5:302018-10-14T02:25:48+5:30
ठाणे : अहमदनगर येथील स्रेहालय येथून पळालेल्या दोन महिलांसह सहा बांगलादेशी नागरिक तसेच एका भारतीय महिलेला डोंबिवलीच्या ढोकलीगाव, आडिवली ...
ठाणे : अहमदनगर येथील स्रेहालय येथून पळालेल्या दोन महिलांसह सहा बांगलादेशी नागरिक तसेच एका भारतीय महिलेला डोंबिवलीच्या ढोकलीगाव, आडिवली येथे छापा टाकून पोलिसांनी अटक केली.
एक बांगलादेशी नागरिक हा शिपिंग कंपनीत इंजिनचालक असून त्याच्याकडे तीन जन्मतारखांचे कागदपत्रे आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक अनधिकृतरीत्या वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई केली. आरोपींकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र तसेच शाळा सोडल्याचा दाखला मिळाला. इमदादूल हा ठाणे तुरुंगात असलेल्या भावाला भेटण्यासाठी लपून भारतात आला होता.
नगरहून पळाल्या
पोलीस चौकशीत एका भारतीय महिलेसह, एक बांगलादेशी महिला स्नेहालय येथून पळून आल्याची माहिती पुढे आली. दोघींची अहमदनगर पोलिसांनी पिटा अॅक्टनुसार केलेल्या कारवाईतून सुटका केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी स्रेहालय येथे केली होती. त्या दोघींसह चौघींनी तेथून पलायन केले होते.