भिवंडीत लुटमार करणाऱ्या सहा दरोडेखोरांसह चार घरफोडे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:09 AM2019-07-26T00:09:32+5:302019-07-26T00:09:45+5:30
२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत : आठ घरफोड्या, चोºया उघडकीस
भिवंडी : माणकोली येथील प्रभात केबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून गोदामातील १३ लाखांचा माल लुटणाºया सहा दरोडेखोरांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे. त्याचबरोबर भिवंडीतील विविध ठिकाणी घरफोडी व वाहनांची चोरी करणाºया टोळीलाही गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
बैतुल्ला रु आबली चौधरी (४५, घाटकोपर), कबीर उस्मान शेख (४२, विरार), स्वप्नील राजेंद्र पांचाळ (३६, कल्याण), बबलू जंगबहादूर विश्वकर्मा (३८, साकीनाका), पूरण शेरबहादूर सोनार (२२, मुंबई), दीपक विश्वकर्मा (२४, लालबाग) अशी प्रभात कंपनीवरील दरोड्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आपण खरेदी करीत असलेली केबल चोरीची आहे, हे माहीत असूनही ती विकत घेणारा जमाल मजीद शेख (घाटकोपर) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने माणकोली येथे असलेल्या प्रभात केबल प्रा.लि. कंपनीच्या गोदामाची भिंत फोडून गोदामातील १३ लाख २३ हजार ४८६ रुपये किमतीची केबल चोरून नेली होती. यावेळी तेथील कर्मचाºयांना चाकूचा धाक दाखवून, मारहाण करत त्यांच्याकडील चार हजार ५०० रूपयांची रोख रक्कम त्याने पळवली होती. याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील दरोडेखोरांना मुंबईतून ४८ तासांत अटक केली आहे.
दरम्यान, भिवंडीत वाहनचोरी व घरफोडी करणाºया इजाज अख्तर शेख (२०, कापतलाव, भिवंडी), जाहिद मेहमूद अख्तर अन्सारी (२३, जैतुनपूर), इब्राहिम शरीफ शेख (३५, शांतीनगर), मोफैज यासीम अनिस शेख (२०, पिराणीपाडा) या चार आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. त्यांनी भिवंडी व कल्याण येथे आठ घरफोड्या व सहा मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून सात लाख २९ हजार रु पयांचे सोन्याचे दागिने व रोख सात लाख सात हजार तसेच एक लाख रु पये किमतीची वाहने असा एकूण १५ लाख ३६ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिस्तूल, गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे हस्तगत
भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजनोलीनाका येथे अरविंद सहदेव अवटे याच्याकडून एक स्वयंचलित पिस्तूल व गावठी कट्ट्यासह १५ जिवंत काडतुसे भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने केली.