ठाणे जिल्ह्यातील सहा दलित वस्त्या होणार स्मार्ट
By Admin | Published: November 16, 2015 02:15 AM2015-11-16T02:15:41+5:302015-11-16T02:15:41+5:30
राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक स्मार्ट दलित वस्ती विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ४५० कोटींची तरतूद केली असून त्यापैकी
ठाणे : राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक स्मार्ट दलित वस्ती विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ४५० कोटींची तरतूद केली असून त्यापैकी १२५ कोटी निधी उपलब्धही झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील सहा दलित वस्त्या स्मार्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांचाही विकास होणार असल्याने मुरबाड तालुक्यातील भीमाईभूमी अर्थात आंबेटेंभे गावाचा विकास होण्याची शक्यता आहे.
बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांची घटनास्थळे व ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. त्या अनुषंगाने मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गावाचेही पर्यटनस्थळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे गाव बाबासाहेबांचे आजोळ आहे. याबरोबरच दलित वस्त्यांच्या सर्वंकष विकासाची योजना राबविण्यात येत आहे. याच योजनेला ‘स्मार्ट दलित वस्ती’ असे नाव दिले असून याअंतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील ७५ टक्के दलित वस्ती असलेल्या एका गावाचा समावेश होणार आहे.
लाडवंजारी समाजाला जातीचे दाखले देण्यात येत नसल्याच्या तक्र ारी होत्या. त्या अनुषंगाने जातपडताळणी समितीला लाडवंजारी समाजाला जातीचे दाखले देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन प्रवेशाबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. (प्रतिनिधी)