सेक्स रॅकेटमधून सहा तरुणींची ठाणे पोलिसांनी केली सुटका: महिला दलाल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 09:01 PM2019-08-08T21:01:02+5:302019-08-08T21:13:20+5:30

उच्चभ्रू मॉडेल्स, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून भूमीका करणाऱ्या तरुणींकडून ‘सेक्स रॅकेट’ चालवित असल्याची ठाणे पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने दलाल महिलेला ठाण्यातून अटक केली. तिच्या तावडीतून सहा तरुणींचीही सुटका करण्यात आली आहे.

Six girl released from sex racket by Thane Polic: One lady brothel broker arrested | सेक्स रॅकेटमधून सहा तरुणींची ठाणे पोलिसांनी केली सुटका: महिला दलाल अटकेत

एका मॉडेलचा ५० हजारांमध्ये ‘सौदा’

Next
ठळक मुद्दे कनिष्ठ कलाकार आणि उच्चभ्रू मॉडेल यांच्याकडून सुरु होता देहव्यापारठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची कारवाई एका मॉडेलचा ५० हजारांमध्ये ‘सौदा’

ठाणे: ट्वीटर अ‍ॅप्लीकेशनमध्ये जाहिरात देऊन कनिष्ठ कलाकार तरुणी आणि उच्चभ्रू मॉडेल यांच्या मार्फतीने हजारो रुपयांच्या मोबदल्यामध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या उषा दोशी (५५, रा. मीरा रोड, ठाणे) या दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. यातील मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उच्चभ्रू मॉडेल्स, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून भूमीका करणा-या तरुणींकडून एक दलाल सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दलालाशी संपर्क साधला. तेंव्हा त्याने मीरा रोड येथील उषा या महिलेचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. उषाशी कडलक यांच्या पथकाने संपर्क साधला असता, तिने एका मॉडेलसाठी ५० हजारांची बोली केली. सौदा पक्का झाल्यानंतर पोलिसांच्या बनावट गि-हाइकाने या महिलेशी संपर्क केला. तेंव्हा तिने ठाण्याच्या मासुंदा तलावाजवळील हॉटेल साईकृपा येथे येण्यास सांगितले. याठिकाणी पोलीस उपायुक्त दीपक देवराज, निरीक्षक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक अरुण पगार, पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आणि अंशिता मिसाळ आदींच्या पथकाने सापळा लावून उषाला रंगेहाथ पकडले. त्यावेळी तिने शरीरविक्रयासाठी आणलेल्या सहा तरुणींचीही तिच्या तावडीतून पोलिसांनी सुटका केली. मुख्य दलाल आणि सूत्रधार असलेल्या तिचा साथीदार ट्वीटरवर जाहिरात देऊन या तरुणींकडून जबरदस्तीने शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात उषासह दोघाविरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली असून तिच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Six girl released from sex racket by Thane Polic: One lady brothel broker arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.