लसीसाठी सहा किलोमीटर पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:41+5:302021-03-07T04:37:41+5:30
मुंब्राः ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी १५ ठिकाणी लसीकरण केंद्रे १ मार्चपासून सुरू करण्यात आली. परंतु, ...
मुंब्राः ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी १५ ठिकाणी लसीकरण केंद्रे १ मार्चपासून सुरू करण्यात आली. परंतु, दिव्यात मात्र लसीकरणासाठी पात्र असलेल्यासाठी केंद्र सुरू केलेले नाही. यामुळे दिवा शहरातील नागरिकांना लसीकरणासाठी सहा किलोमीटर दूर असलेल्या शीळ येथील आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागते. तेथपर्यंत जाण्यासाठी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधीग्रतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांची ही अडचण दूर व्हावी, तसेच त्यांना सहज लस घेता यावी, यासाठी दिव्यात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या दिवा मंडळचे अध्यक्ष आदेश भगत यांनी केली आहे.