परिवहन समितीचे सहा सदस्य अखेर निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:47+5:302021-06-03T04:28:47+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य फेब्रुवारीत विहित कालावधीअंति निवृत्त झाले होते. परंतु, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील २५ ...

Six members of the transport committee have finally retired | परिवहन समितीचे सहा सदस्य अखेर निवृत्त

परिवहन समितीचे सहा सदस्य अखेर निवृत्त

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य फेब्रुवारीत विहित कालावधीअंति निवृत्त झाले होते. परंतु, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील २५ (७) मधील तरतुदींनुसार मार्चपासून पुढे तीन महिन्यांची मुदतवाढ त्यांना मिळाली होती. ती मुदत ३१ मे रोजी संपली. मनपा निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी या सदस्यांची मागणी होती. त्यावर विधी विभागाकडे मागितलेला अभिप्राय आणि कायद्यातील तरतुदीनुसार मुदतवाढ नाकारण्यात आली. त्यामुळे त्या सहा सदस्यांचा कालावधी अखेर संपुष्टात आला आहे. विशेष म्हणजे यात विद्यमान सभापतींचाही समावेश आहे.

परिवहन समितीमधील सदस्यांना चार वर्षांचा कालावधी मिळतो. फेब्रुवारीत सभापती मनोज चौधरी, संजय पावशे, प्रसाद माळी, कल्पेश जोशी, संजय राणे या सदस्यांसह कोरोनामुळे निधन झालेले सदस्य मधुकर यशवंतराव यांचा कालावधी संपला. कोरोनामुळे मनपाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. नोव्हेंबरमध्ये नगरसेवकांचा कालावधीही संपला आहे. त्यात परिवहनच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेलाही चाप बसला आहे. त्यामुळे ही सहा पदे मनपा निवडणूक होईपर्यंत रिक्तच राहतील, असे जाणकारांचे म्हणणे होते.

दुसरीकडे निवडीसंदर्भात निर्माण झालेल्या या पेचाबाबत मनपा सचिव संजय जाधव यांनी त्यावेळी विधी विभागाकडे अभिप्राय मागितला होता. त्यानुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील २५ (७) मधील तरतुदींनुसार निवृत्त झालेल्या सदस्यांना दोन मार्चपासून पुढे तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. या निर्णयामुळे निवृत्त झालेल्या सदस्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, सभा घेण्याचे अधिकार सभापती आणि सदस्यांना नाहीत. त्यामुळे कालावधी वाढूनही परिवहन समिती नामधारीच होती.

कायद्यातील तरतुदी तपासल्या

मनपा निवडणूक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मुदतवाढ मिळावी, असे पत्र सभापती चौधरी आणि सदस्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले होते. यावर सचिव जाधव यांनी पुन्हा विधी विभागाचा अभिप्राय मागितला होता. त्याचबरोबर कायद्यातील तरतुदीही तपासल्या. त्यावरून मुदतवाढ देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

---------------

Web Title: Six members of the transport committee have finally retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.