जिल्ह्यात सहा नवीन महाविद्यालये

By admin | Published: August 17, 2016 02:26 AM2016-08-17T02:26:45+5:302016-08-17T02:26:45+5:30

मुंबई आणि नजीकच्या परिसरात वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागातील जनतेमध्येही शिक्षणाबाबत दिवसेंदिवस होणारी जागरूकता लक्षात घेता

Six new colleges in the district | जिल्ह्यात सहा नवीन महाविद्यालये

जिल्ह्यात सहा नवीन महाविद्यालये

Next

स्नेहा पावसकर, ठाणे
मुंबई आणि नजीकच्या परिसरात वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागातील जनतेमध्येही शिक्षणाबाबत दिवसेंदिवस होणारी जागरूकता लक्षात घेता शासनाने महाविद्यालये आणि काही महाविद्यालयांमध्ये कोर्सेसची संख्या वाढवली आहे. जिल्ह्यात नवीन ६ महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली असून त्यात लॉ कॉलेजेसची संख्या जास्त आहे.
बारावीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या पाहता दरवर्षी महाविद्यालये किंवा पटसंख्या वाढण्याची गरज भासते. त्यातच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी-डोंगराळ भागांत वाहतुकीची साधने, शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असल्यामुळे स्थानिक महाविद्यालयांची संख्या वाढावी, अशी मागणी होऊ लागली. यंदा शासनाने ठाण्यात नव्याने ६ महाविद्यालयांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिली आहे. त्यापैकी ठाण्यात २ आणि नवी मुंबईत १ असे एकूण ३ लॉ कॉलेजेस, भिवंडीमध्ये २ नाइट कॉलेजेस, तर बदलापूरमध्ये एका डिग्री कॉलेजला मान्यता मिळाली आहे. या नवीन महाविद्यालयांमुळे येत्या शैक्षणिक वर्षात तरी स्थानिकांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार का, हे पाहावे लागेल.


१) शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल कॉलेज आॅफ लॉ - एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे)
२) विघ्नहर्ता ट्रस्टचे शिवाजीराव एस. जोंधळे इन्स्टिट्यूट आॅफ लॉ अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालय - एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे)
३) गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज आॅफ लॉ - एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे)
४) स्वयंसिद्ध मित्र संघाचे स्वयंसिद्धी डिग्री नाइट कॉलेज- बीएमएस, बी.कॉम
५) आसरा सामाजिक संस्थेचे आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स नाइट कॉलेज- बी.लिब, बीएमएम, बी.कॉम, बीएमएस, बी.कॉम (ए अ‍ॅण्ड एफ), (बी अ‍ॅण्ड आय), बी.एस्सी-आयटी, बी.एस्सी, बी.एस्सी सीएस, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज
६) ज्ञानप्रसारक शिक्षण प्रसारक संस्थेचे पुष्पलता म्हात्रे वुमेन्स कॉलेज आॅफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स - बीए, बी.कॉम, बीएमएस, बी.कॉम (बी अ‍ॅण्ड आय), बी.एस्सी-आयटी, बी.एस्सी, बी.एस्सी सीएस.

Web Title: Six new colleges in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.