महिलांना शरीरविक्रयास लावणा-या सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 10:48 PM2017-08-16T22:48:53+5:302017-08-16T22:48:53+5:30

पैशांच्या आमिषाने लॉजमध्ये महिलांना शरीरविक्रयास भाग पाडणाºया सहा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली.

Six people arrested for sexually assaulting women | महिलांना शरीरविक्रयास लावणा-या सहा जणांना अटक

महिलांना शरीरविक्रयास लावणा-या सहा जणांना अटक

googlenewsNext

ठाणे : पैशांच्या आमिषाने लॉजमध्ये महिलांना शरीरविक्रयास भाग पाडणाºया सहा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांना १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कल्याणच्या मलंग रोडवरील पिसवली गावातील एका लॉजवरून चार हजारांच्या बदल्यात शरीरविक्रयासाठी एक महिला मुली पुरवते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. तिच्या आधारे १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास या लॉजवर दौंडकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. वाळके, उपनिरीक्षक सुनील चव्हाणके, जमादार राजू महाले, हवालदार अविनाश बाबरेकर, तानाजी वाघमोडे, विजय बडगुजर, विजय पवार, प्रियंका शेळके आणि बेबी म्हशाळ आदींच्या पथकाने धाड टाकून लॉजचा चालक हरिश्चंद्र शेट्टी (५७), खजिनदार राहुल दत्त (३७), व्यवस्थापक सत्यनारायण पाल (४२), विजय शेट्टी (४४), वेटर श्रीकांत मोहंती (३३) आणि दलाल विग्यान सामल (२४) या सहा जणांना अटक केली. हरिश्चंद्र याच्यासह पाच जणांनी लॉजमध्ये मुली पुरवणाºया सामल या दलालाच्या मदतीने दोन महिलांना आणि सत्यनारायण याने उर्वरित दोन अशा चार महिलांना लॉजवर बोलवले होते. शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेण्यासाठी महिलेची मागणी करणाºयाकडून या टोळीने एका ग्राहकाकडून पैसेही स्वीकारले होते. चौघींपैकी एका महिलेला त्याच्यासोबत पाठवल्यानंतर या पथकाने या सहा जणांच्या टोळक्याला रंगेहाथ अटक केली. शिवाय, त्यांच्या ताब्यातून या चारही महिलांची सुटका केली. त्यांच्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ९४ हजार ९१० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. वाळके करीत आहेत.
 

 

Web Title: Six people arrested for sexually assaulting women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.