बदलापूरच्या विज्ञान प्रदर्शनात ७४ प्रकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:52 PM2019-11-19T22:52:10+5:302019-11-19T22:52:17+5:30
विविध ठिकाणच्या शाळांचा सहभाग; प्रत्युष सोनावणे, आदित्य घोरड याने पटकावला प्रथम क्रमांक
बदलापूर : आदर्श विद्यामंदिर आणि द यंग सायंटिस्ट डेन, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श विद्यामंदिरात रविवारी विज्ञान प्रकल्प स्पर्धा प्रदर्शन पार पडले. या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक रात्र विद्यालयाच्या प्रत्युष सोनावणे आणि कार्मेलच्या कॉन्व्हेंट स्कूलच्या आदित्य घोरड याने पटकावला. द्वितीय क्र मांक कार्मेल कॉंन्व्हेंटच्या सानिका जाधव तर तृतीय क्र मांक इनरव्हील शाळेच्या देवेंद्र भूषण कुलकर्णी, आर्यन मयेकर यांनी पटकावला. खुल्या गटात वसारच्या जिल्हा परिषद शाळेच्या मोहिनी पंडित बागुल यांनी बाजी मारली. या प्रदर्शनात एकूण ७४ प्रकल्प मांडण्यात आले.
रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत आदर्श विद्यामंदिर शाळेच्या संकुलात ही स्पर्धा पार पडली. या प्रदर्शनाचे उद्घाटन विख्यात होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथील खगोल भौतिकीमधील तरुण संशोधक प्रितेश रणदिवे आणि आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे सदस्य तसेच माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात चार तालुक्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
आदर्श विद्या प्रसारक संस्था यंदा आपला हीरक महोत्सव साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच अभियांत्रिकी विषयातील ७४ विविध प्रकल्पांचा समावेश होता. या प्रदर्शनात बदलापूर शहरी आणि ग्रामीण भागासह अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर तसेच भिवंडी तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. तसेच यावर्षी महाविद्यालय गट आणि खुला गटाचाही समावेश केला होता.
परीक्षक म्हणून घरडा केमिकल्सचे मुख्य संशोधक प्रीतेश रणदिवे, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संशोधक डॉ. दीपक नळदकर , प्रशांत जोशी, भूवैज्ञानिक प्रणित देशमुख आणि पुण्यातील डॉ. वृषाल केळकर यांनी काम पाहिले. मोठ्या गटात प्रथम क्र मांक रात्र विद्यालयाच्या प्रत्युष सोनावणे आाणि कार्मेलच्या कॉन्व्हेंट स्कूलच्या आदित्य घोरड याने पटकावला. द्वितीयक्रमांक कार्मेल कॉन्व्हेंटच्या सानिका जाधव तर तृतीय क्र मांक इनरव्हील शाळेच्या देवेंद्र कुलकर्णी, आर्यन मयेकर यांनी पटकावला. खुल्या गटात वसारच्या जिल्हा परिषद शाळेच्या मोहिनी पंडित बागुल यांनी बाजी मारली. कार्यक्र मासाठी आदर्श विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी देशपांडे व सहकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली.
छोट्या गटातून वेद घोसाळकर अव्वल
प्रकल्पासाठी छोट्या गटातून प्रथम क्र मांक जी. आर. पाटील विद्यालयाच्या वेद घोसाळकर आणि आरीश शेख यांनी पटकावला तर द्वितीय क्र मांक कार्मेलच्या टिया चॅटर्जी, पूर्वा प्रभुचंदेरकर, तन्मय चॅटर्जी आणि तृतीय क्र मांकही कार्मेलच्या सिद्धार्थ चक्र वर्ती या विद्यार्थ्याने पटकावला.