‘त्या’ खुनाचा छडा लावण्यासाठी सहा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:50 AM2018-05-15T03:50:21+5:302018-05-15T03:50:21+5:30

एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे प्रेत एका गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील निर्जनस्थळी टाकण्यात आले होते.

Six squads for the 'hunt' | ‘त्या’ खुनाचा छडा लावण्यासाठी सहा पथके

‘त्या’ खुनाचा छडा लावण्यासाठी सहा पथके

Next

ठाणे : एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे प्रेत एका गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील निर्जनस्थळी टाकण्यात आले होते. ४ मे रोजी घडलेल्या या घटनेचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळे वागळे इस्टेट पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग अशा सहा पथकांकडून या खुनातील आरोपी आणि मृतदेहाचा शोध सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
वागळे इस्टेट रोड क्रमांक २१ येथील बुश कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जनस्थळी एका गोणीत अनोळखी तरुणाचा मृतदेह पोलिसांना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मिळाला. त्याची ओळख पटू नये, म्हणून अ‍ॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून चेहरा विद्रूप केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एक आठवडा उलटूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शिवाय, हा खून कोणी केला, याचाही तपास लागलेला नाही. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांची दोन पथके तयार केली आहेत.
याशिवाय, गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटची वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांची तीन पथके तर युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे एक अशी सहा पथके या एका खुनाच्या तपासासाठी कार्यरत आहेत. याच आजूबाजूच्या २०० ते २५० सीसीटीव्हींची तपासणी केली आहे.
अनेक खबºयांनाही या कामासाठी प्रोत्साहित केले आहे. शिवाय रिक्षाचालक, दुकानदार, फेरीवाले, विक्रेते, लॉण्ड्रीचालक अशा अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत केवळ मृतदेहाच्या पॅण्टवर ‘ठाकूर’ इतकेच लिहिलेल्या नावावरून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>पोलिसांसमोर आव्हान
वागळे इस्टेट भागात हा मृतदेह अन्य भागातून आणून टाकल्याची शक्यता असली, तरी तो मृतदेह कोणाचा आणि त्याचा खून कोणी आणि कोणत्या कारणाने केला, हे कोडे सोडवणे पोलिसांसमोर आव्हान असल्याचे तपास करणाºया अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Six squads for the 'hunt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.