राज्य शिक्षक पुरस्कारासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील सहा शिक्षकांची निवड

By सुरेश लोखंडे | Published: August 29, 2019 07:58 PM2019-08-29T19:58:20+5:302019-08-29T20:11:35+5:30

समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणा:या व शैक्षणिक क्षेत्रत उत्कृष्ट काम करणा:या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रात्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह आदिवासी क्षेत्रतील प्राथमिक शिक्षकांसह, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, विशेष शिक्षक व अपंग शिक्षक आदींना राज्याच्या शालये शिक्षण क्रीडा विभागाकडून राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे

Six teachers from Thano-Palghar district selected for state teacher award | राज्य शिक्षक पुरस्कारासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील सहा शिक्षकांची निवड

अंबरनाथ तालुक्यातील आडीवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका चंदाराणी माधव कुसेकर या एकमेव महिला शिक्षिकेची राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड

Next
ठळक मुद्दे* गुरूवारी रंगशारदा नाटय़गृहात पुरस्कार वितरण* ठाणे  जिल्ह्यातून एकमेव महिला शिक्षिकेची निवड विशेष म्हणजे तिन्ही पुरस्कारांसाठी डहाणू तालुक्यातील शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड

सुरेश लोखंडे
ठाणे  : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2018-19 या वर्षाच्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील 107 शिक्षकांची निवड केली. त्यात ठाणे  व पालघर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व आदिवासी प्राथमिक आदी  सहा शिक्षकांची निवड या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तसा अध्यादेशही 28 ऑगस्ट रोजी जारी झाला आहे.
          समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणा-या व शैक्षणिक क्षेत्रत उत्कृष्ट काम करणा-या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रात्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह आदिवासी क्षेत्रतील प्राथमिक शिक्षकांसह, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, विशेष शिक्षक व अपंग शिक्षक आदींना राज्याच्या शालये शिक्षण क्रीडा विभागाकडून राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. या ठाणे  व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन शिक्षकांची या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी या राज्य शिक्षक पुरस्काराचे वितरण मुंबईच्या बांद्रा येथील रंगशारदा नाटय़गृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
          या पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील तीन शिक्षकांची निवड झाली आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील आडीवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका चंदाराणी माधव कुसेकर या एकमेव महिला शिक्षिकेची राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ठाणे  व पालघर जिल्ह्यातून त्या एकमेव महिला शिक्षका आहेत. याशिवाय माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पंडीतराव पाटील यांची तर आदिवासी क्षेत्रतील प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी शहापूर तालुक्यातील चेरवली येथील जिल्हा परिषद शाळेचे डॉ. गंगाराम गणपत ढमके यांची निवड झाली आहे.
        पालघर जिल्ह्यातील निवड झालेल्या तीन शिक्षकांमध्ये एक ही महिला शिक्षकेचा समावेश नाही. विशेष म्हणजे तिन्ही पुरस्कारांसाठी डहाणू तालुक्यातील शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली. यामध्ये डहाणू तालुक्यातील दह्याळे येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक संतोष भगवान तळेकर यांची तर माध्यमिक शिक्षक म्हणून डहाणू तालुक्यातील के.एल.पोदा हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक चंद्रकांत लक्ष्मण खुताडे यांनी या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याप्रमाणोच डहाणू तालुक्यातील गोवणो येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक विजय बाळासाहेब पावबाके यांची आदिवासी क्षेत्रतील प्राथमिक शिक्षक म्हणून या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Web Title: Six teachers from Thano-Palghar district selected for state teacher award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.