सहा हजार नागरिकांनी काढले ऑनलाइन लर्निंग लायसन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:43 AM2021-08-19T04:43:40+5:302021-08-19T04:43:40+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : आता घरबसल्या ऑनलाइन लायसन्स काढले जात आहेत. वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढायचा ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : आता घरबसल्या ऑनलाइन लायसन्स काढले जात आहेत. वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल, तर एमबीबीएस डॉक्टरांचे ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, मागील तीन महिन्यांत सहा हजार नागरिकांनी कल्याण आरटीओ कार्यालयांतून ऑनलाइनद्वारे लायसन्स काढले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली.
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये पूर्ण मनुष्यबळासह सुरू झाली आहेत. मात्र, कल्याण आरटीओचे कामकाज आता दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. ऑनलाइन लायसन्स सुविधेबाबत जनजागृती झाल्याने अनेक जण त्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सध्या कामाचा बोजा अचानक वाढला आहे. परिणामी कल्याण आरटीओमध्ये विविध तांत्रिक कामांसाठी नागरिकांना तारखा मिळताना वेटिंगवर रहावे लागत आहे.
तीन महिन्यांत सहा हजार लर्निंग लायसन्स ऑनलाइन
जून -१,७२७
जुलै-२,८३७
ऑगस्ट-१,४३४
--------------
वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे
वय कितीही असले तरी नियमात बसत असल्यास लायसन्स देण्याची मुभा आहे. त्यासाठी आता ५० वर्षे झालेले, त्यातही जे व्यावसायिक वाहन चालवतात त्यांना नवीन लायसन्स काढताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
-------------------
वरिष्ठ पातळीवरील मार्गदर्शनानुसार आता आम्ही डॉक्टरांचे पॅनल तयार करण्याचा विचार करत आहोत. त्याबाबतची मार्गदर्शक सूचना आली आहे. अजून त्यास सुरुवात झालेली नसली तरी आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहोत. ऑनलाइनमुळे काम वेगाने आणि सुटसुटीत होत आहे.
- तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,कल्याण.
-----------कल्याण आरटीओ : वाहनचालकांना दिलासा
स्टार १०६०

-----------