ठाण्यात एका रिक्षासह सहा वाहनांना आग
By admin | Published: July 17, 2017 01:13 AM2017-07-17T01:13:40+5:302017-07-17T01:13:40+5:30
ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरातील गवते चाळीत राहणाऱ्या योगिता भांगरे (३५) यांची रिक्षा आणि एका दुचाकीला आग लागल्याचे रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर आणखी चार दुचाक्यांनाही आग लागल्याचे समजले. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून ती कोणी आणि का लावली, याचाही तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. रविवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर अधिक तपास करीत आहेत.लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरातील गवते चाळीत राहणाऱ्या योगिता भांगरे (३५) यांची रिक्षा आणि एका दुचाकीला आग लागल्याचे रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर आणखी चार दुचाक्यांनाही आग लागल्याचे समजले. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून ती कोणी आणि का लावली, याचाही तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. रविवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर अधिक तपास करीत आहेत.
महिनाभरात दुसरी घटना
एक महिन्यापूर्वी लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-३ येथेही दुचाकी आणि रिक्षांना आगी लावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस अजूनही तपास करीत आहेत. त्याच भागात काही दिवसांपूर्वीही वाहनांना आगी लावण्याचे प्रकार घडले होते. सहा महिन्यांपूर्वी ठाण्याच्या सॅटीस परिसरातही दुचाकयांना आग लावली होती.
उपायुक्तांनी घेतली बैठक
महिला रिक्षा चालकाची रिक्षा आणि दुचाकी जाळल्याप्रकरणाची ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी गंभीर दखल घेतली. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबतचा आढावा घेतला. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी आरोपींना शोधण्याचे आदेश दिले.