सहावर्षीय मुलीवर पहारेकऱ्याचा अत्याचार, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:49 AM2018-05-12T04:49:01+5:302018-05-12T04:49:01+5:30

ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाºयावर असल्याचे दिसून आले.

Six-year-old girl atrocities on the guard, shocking type of Thane District Civil Hospital | सहावर्षीय मुलीवर पहारेकऱ्याचा अत्याचार, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

सहावर्षीय मुलीवर पहारेकऱ्याचा अत्याचार, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Next

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाºयावर असल्याचे दिसून आले. रुग्णालयातून बाळचोरीच्या घटनेनंतर गुरु वारी या रु ग्णालयाच्या पहारेकºयानेच उपचारार्थ दाखल असलेल्या महिला रु ग्णाच्या सहा वर्षीय चिमुरडीवर रुग्णालयातच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पहारेक ºयास गुरु वारी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण पश्चिम येथील रहिवासी असलेल्या पीडित चिमुरडीच्या आईला काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. गुरु वारी ती आपल्या वडिलांसोबत रु ग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रसूतिगृहात आईला भेटण्यासाठी आली होती. याचदरम्यान दुपारी सव्वाचार वाजता पीडित चिमुरडी एकटीच पाणी आणण्यासाठी त्या इमारतीच्या तळमजल्यावर आली. ती एकटी असल्याचे पाहून रुग्णालयाच्या तळमजल्यावरील लेबर वॉर्ड येथे पहारेकरी म्हणून तैनात असलेला हरीश नरवार (५२) याने त्याच वॉर्डाच्या शेजारी असलेल्या एका खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, चिमुरडीने तिच्यासोबत झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार नोंदवल्यावर रात्री पहारेकºयाविरोधात लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तत्काळ त्याला अटक केली.
शुक्रवारी त्याला ठाणे जिल्हा न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच हरीश याच्याविरोधात यापूर्वी अशा प्रकारच्या रुग्णालयात काही तक्रारी आहेत का, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मागवल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली.

Web Title: Six-year-old girl atrocities on the guard, shocking type of Thane District Civil Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.