भिवंडीत तरुणांच्या किरकोळ वादातून अ‍ॅसिड हल्ला; सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 01:07 AM2020-10-10T01:07:36+5:302020-10-10T01:07:46+5:30

ऍसिड हल्ल्यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर

six youth injured in Acid attack from a minor dispute in bhiwandi | भिवंडीत तरुणांच्या किरकोळ वादातून अ‍ॅसिड हल्ला; सहा जण जखमी

भिवंडीत तरुणांच्या किरकोळ वादातून अ‍ॅसिड हल्ला; सहा जण जखमी

Next

भिवंडी: भिवंडी शहरातील साई नगर ताडाळी अंजुरफाटा रोड येथे गुरुवारी झालेल्या क्षुल्लक वादातून मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती , या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांवर तीन ते चार जणांनी ऍसिड फेकून हल्ला केला. ज्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. या ऍसिड हल्ल्यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे .

शहरातील ताडाळी साईनगर येथील निखिल शर्मा हा गुरुवारी कामावरून घरी परतत असताना त्या परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीचा धक्का लागल्याने या कारणातून मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली  होती ,त्यानंतर निखिल शर्मा व त्याचे मित्र अभिषेक देशमुख ,अभिषेक शर्मा ,रोहित पांडे व सुरज पटेल हे मारहाण का केली , याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी गेले असता त्यांच्यात बाचाबाची झाली व मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली त्या वेळी एका गटाकडून बेसावध असणाऱ्या या मुलांवर समोरच्या तीन ते चार व्यक्तींनी ऍसिड फेकले . या अचानक झालेल्या हल्ल्याने हे 5 ते 6  युवक भाजल्याने व्हीव्हळत तेथून पळत आपल्या घराकडे आले. या भांडणात एक महिला देखील जखमी झाली असल्याचे समजते . या ऍसिड हल्ल्यातील जखमींना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे तर अभिषेक देशमुख ,निखिल शर्मा व अभिषेक शर्मा यांना गंभीर जखम असल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे कळवा रुग्णालय या ठिकाणी रवाना केले असून स्थानिक नारपोली पोलिसांनी या जखमी युवकांचे जबाब नोंदवून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: six youth injured in Acid attack from a minor dispute in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.