आजूबाजूचे रहिवासी झाले दुर्घटनेत जखमी, सहा वर्षीय चिमुरड्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:16 AM2017-11-25T03:16:32+5:302017-11-25T03:16:40+5:30
ठाणे : भिवंडी इमारत दुर्घटनेतील पाच जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी हलवण्यात आले आहे.
ठाणे : भिवंडी इमारत दुर्घटनेतील पाच जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून त्यांना प्रामुख्याने डोक्याला आणि छातीला मार लागला आहे. त्यामध्ये ५५ वर्षांच्या महिलेसह ६ वर्षीय चिमुरड्याचा समावेश आहे. तसेच त्यातील तीन जण त्या दुर्घटनेतील इमारतीच्या आजूबाजूचे रहिवाशी आहेत. त्या सर्व रुग्णांना एकाच वॉर्डमध्ये ठेवले आहे.
भिवंडीत नवीवस्तीत इमारत कोसळली. त्यातील रेहान खान (६) आणि सलमा अन्सारी (५५) हे दोघे त्या इमारतीतील रहिवाशी आहे. रेहान हा आईवडिल आणि दोन बहिणीसह मागील तीन ते चार वर्षांपासून राहत आहे. बहिणींची सकाळची शाळा असल्याने त्या शाळेत गेल्या होत्या. इमारत पडत असताना, रेहानने बाहेर पडण्यासाठी धाव घेतली त्यावेळी इमारतीचा भाग कोसळला. त्या ढिगाºयाखाली तो अडकला. त्याच्या हाताचा पंजा दिसल्याने त्याला स्थानिकांनी तातडीने बाहेर काढले. मात्र, डोक्याला मार लागल्याने त्याला ठाण्यात हलवण्यात आले. त्याचे आईवडिल त्या ढिगाड्यामध्ये अडकले होते. हे खान कुटूंब पहिल्या मजल्यावर राहणारे असून रेहानचे वडील आशफाक उर्फ गब्बर खान हे लॉरीचालक असल्याची माहिती काका मुदसीर खान यांनी ‘लोकमत’ला दिली. तसेच मुदसीर हे सध्या रेहान बरोबर रुग्णालयात असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्याच इमारतीतील सलमा अन्सारी (५५) यांच्या छातीला मार लागला असून त्यांची प्रकृती बºयापैकी स्थिर आहे.
>ख्वाजा महेमुद सय्यद (५५) हे दुर्घटना घडली तेंव्हा इमारतीच्या बाजूला असलेल्या शौचालयात गेले होते. तेथून बाहेर पडताना काही तरी त्यांच्या कपाळावर येऊन आदळल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. वयोमानामुळे त्यांना तातडीने ठाण्यात हलवले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर त्या इमारतीच्या मागील बाजू राहणारे आसीफ खान (२१) आणि आबीद खान (२१) हे भाऊही जखमी झाले आहे. त्यातील एकाच्या छातीला तर दुसºयाच्या पायाला मार लागला आहे.