सहाव्या आयोगामुळे ८५ कोटींचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:32 AM2019-12-23T00:32:51+5:302019-12-23T00:32:55+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कामगार-कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगावर आधारित वेतनश्रेणी व भत्त्यांच्या करारावर शनिवारी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कामगार-कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगावर आधारित वेतनश्रेणी व भत्त्यांच्या करारावर शनिवारी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने स्वाक्षºया झाल्या. त्यामुळे आता त्याचा फायदा कामगारांना होणार आहे. या करारापोटी वार्षिक सुमारे ८५ कोटी रुपयांचा बोजा पालिकेवर पडणार असून कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या करारावर महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या वतीने संजीव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी आणि युनियनच्या वतीने अध्यक्ष रवी राव, उपाध्यक्ष शुभांगी कदम यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी स्वाक्षºया केल्या. स्वाक्षºया झाल्यामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महापालिकेच्या कर्मचाºयांना मिळणार हे फायदे
महापालिका कर्मचाºयांना १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००५ या कालावधीकरिता असलेला करार ३१ डिसेंबर २००५ रोजी संपल्यानंतर सहाव्या वेतन आयोगानुसार महापालिका कर्मचाºयांना वेतनश्रेणी आणि भत्ते लागू व्हावेत, अशी मागणी युनियनने केली होती. त्यानुसार, हा करारनामा करण्यात आला. या करारानुसार ज्यांना ग्रेड पे मध्ये ३५ पेक्षा कमी वाढ दिली होती, त्यांना १ जानेवारी २००६ पासून ग्रेड पे मध्ये ३५ टक्के वाढ, ग्रॅच्युएटीच्या मर्यादा सात लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढ, पाच हजार वैद्यकीय भत्ता व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कॅशलेस हॉस्पिटलायझेशन विमा योजना, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, प्रसविका, वॉर्डबॉय, आया आदींसह शिपाई, आपत्कालीन विभाग व अग्निशमन विभागाकडील सर्व अधिकार-कर्मचारी, सफाई कामगार, फिल्ड वर्कर, सुपिरीयर फिल्ड वर्कर, ड्रेनेज विभागाकडील मॅनहोलमध्ये उतरून काम करणारे कामगार यांच्या कामाचे धोकादायक स्वरूप पाहता त्यांच्याकरिता संवर्गनिहाय व पे बॅण्डनुसार ५ ते २५ लाखांपर्यंत विमा संरक्षण आदींसह इतर फायदा हे कामगारांना होणार आहेत.