लुघ उद्योगांचे भीष्म पितामह डॉ. मधुसूदन खांबेटे यांचे निधन

By अजित मांडके | Published: November 18, 2022 04:50 PM2022-11-18T16:50:09+5:302022-11-18T16:50:23+5:30

वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

small Industries idealist dr Madhusudan Khambete passed away | लुघ उद्योगांचे भीष्म पितामह डॉ. मधुसूदन खांबेटे यांचे निधन

लुघ उद्योगांचे भीष्म पितामह डॉ. मधुसूदन खांबेटे यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : लघु उद्योगांचे मार्गदर्शक किंबहुना भीष्म पितामह तसेच व्यापाऱ्यांची मोठ एकत्र बांधणारे टिसा व कोसिआचे संस्थापक, अध्यक्ष मधुसूदन खांबेटे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी सकाळी ११. ३० च्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन नातवंडे, नात सुना, जावई असा परिवार आहे. शनिवारी पार्थीव अंतिम दर्शनासाठी टीसा हाऊस रोड नं. १६ वागळे इस्टेट येथे ठेवले जाणार आहे. त्यांच्या जाण्याने लघु उद्योगांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

                डॉ. मधुसूदन उर्फ आप्पासाहेब खांबेटे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ले या गावात स्वांतत्र्यापूर्वी झाला. ते तीन महिन्यांचे असतानाच ते कोलकता येथे गेले. त्यानंतर त्यांचे सुरवातीचे शिक्षण गुजराती माध्यमाच्या शाळेत झाले. १९३८ ते १९४२ दरम्यान त्यांचे शिक्षण झाले. त्यामुळे त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदी व गुजराती देखील येत होती. १९४८ मध्ये स्वांतत्र्यानंतर नागपुरात त्यांनी मॅट्रीक पूर्ण केले. त्यानंतर ते मुंबईला आले व पुढील इंटरमीडीएट सायन्स र्पयत शिक्षण पूर्ण केले. ते केवळ एक खेळाडूच नव्हते तर त्यांनी आपल्या शाळेच्या हॉकी, फुटबॉल आणि खो - खो संघाचे नेतृत्व देखील केले होते. दरम्यान त्यांनी पुढील एरोनॉटील इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी कोलकत्ता येथे जाणार होते. परंतु, सरकारने एरलाईन उद्योग ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुढे कोर्सला पुढे जाण्यात अर्थ नसल्याचे सांगितले. त्याचवेळेस त्यांना मे. वेस्टींगहाऊस सॅक्सबी अॅंड फार्मरमध्ये ब्रेक मिळाला. त्यावेळेस शिक्षण आणि काम त्यांनी एकत्रच सुरु केले. त्यानंतर ते इंग्लडला सुध्दा गेले. मात्र त्यांच्यातील खरा उद्योजक हा कोलकत्ता येथे घडला. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह ठाण्यात स्थायीक झाले. त्यानंतर त्यांनी रेल्वेला काही सुटय़ा भागांचा पुरवठा आणि देखभाल करण्याचे काम चालू ठेवले. याच काळात त्यांनी वागळे इस्टेट भागात दिड लाख व १५ हजार उसनवार घेऊन ५०० चौरस मीटरचा भुखंड खरेदी केला. याठिकाणी वडीलांच्या नावाने त्यांनी कंपनी सुरु केली. ते स्वत: या कंपनीत १६ ते १८ तास राबत होते.

असा झाला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन टीसाचा जन्म
सुरवातीला लघु उद्योग चालवताना उद्योजकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे आप्पांनी या उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी १९७४ साली टिसाची स्थापना केली. त्यानंतर जानेवारी २०२२ र्पयत ते या संस्थेचे अध्यक्ष होते. जिल्ह्यात लुघ उद्योग वाढविण्याबरोबर रोजगार निर्मितासाठी तसेच ठाण्याच्या विकासासाठी टीसाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील अथवा महाराष्ट्रातील उद्योगासाठी काम करतांना लघु उद्योगांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावरील अडचणी येत होत्या. यातूनच चेम्बर ऑफ स्मा1ल इंडस्ट्री असोसिएशन (कोसिआ) ची स्थापना झाली आणि अप्पा त्याचे अध्यक्ष झाले. कोसिआच्या माध्यमातून चीन व सेनेगल येथे उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व देखील अप्पांनी केले.

दरम्यान वयाच्या ७५ चे असतांना त्यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांना पकडण्यात त्यांना यश आले. यावेळी एकाने त्यांच्या पाठीवर शिग खुपसली होती. मात्र ते बचावले, त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांचा ठाणे भुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वयाची ६५ वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी समर्पित केली.२०१४ मध्ये त्यांनी पिअरलेसेसचा अॅटक येऊन गेला. मात्र अवघ्या सहा महिन्याते ते पुन्हा जीना चढू उतरु लागले होते. परंतु काही दिवसांपूर्वी ते घरात पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. तेव्हापासून ते आजारी होते. अखेर शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: small Industries idealist dr Madhusudan Khambete passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.