हुक्क्याच्या धुराने तरुणाईला घातला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:16 AM2021-01-04T00:16:52+5:302021-01-04T00:17:01+5:30
पोलिसांची कृपादृष्टी : कारवाई होत नसल्याने संताप, कुठे लपूनछपून तर कुठे खुलेआम धंदा सुरु
तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात अडकवण्याची सर्व सोय आजकाल बार, पबमध्ये खुलेआम आढळते. त्यात आता हुक्का पार्लरची संस्कृती रुजली असून तरुणांची पावले याकडे वळू लागली आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे बेकायदा पार्लर ठिकठिकाणी सुरु आहेत. गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण विभागाने अशा पार्लरवर छापा घातला. याच पार्श्वभूमीवर हुक्का पार्लरचे नेमके काय वास्तव आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.
तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात अडकवण्याची सर्व सोय आजकाल बार, पबमध्ये खुलेआम आढळते. त्यात आता हुक्का पार्लरची संस्कृती रुजली असून तरुणांची पावले याकडे वळू लागली आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे बेकायदा पार्लर ठिकठिकाणी सुरु आहेत. गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण विभागाने अशा पार्लरवर छापा घातला. याच पार्श्वभूमीवर हुक्का पार्लरचे नेमके काय वास्तव आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.
स्टेटस जपण्यासाठी नशा
nसुरुवात हर्बल अर्थात नैसर्गिक हुक्का पार्लरने झाली. पुढे याच
हर्बलमधून तंबाखूजन्य पदार्थांची तसेच निकोटीनची मागणी वाढल्यामुळे अनेक हुक्का
पार्लरमधून निकोटीनचाही
धूर यायला सुरुवात झाली.
nअनेक ठिकाणी स्टेटस म्हणूनही या नशेचा वापर होऊ लागला. महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये क्रेझ निर्माण झालेली पार्लर महाविद्यालयांच्या आसपास किंवा शहराच्या आडोशालाही छुपकेछुपके सुरु झाली.
nठाण्यातील घोडबंदर रोड, मुंब्रा, वागळे इस्टेट, उपवन, येऊर, कौसा, कोपरी आणि कापूरबावडी भागांमध्ये उच्चभ्रू आणि अगदी झोपडपट्टीतील वस्त्यांमध्येही या हुक्का पार्लरचा धूर निघतो.
वयाचे बंधन नाही
तरुणांमध्ये या हुक्का पार्लरची क्रेझ असली तरी हुक्का ओढणाऱ्यांमध्ये वयाचे कोणतेही बंधन पाळले जात नसल्याचेही आढळते. अगदी १५ वर्षांपासून ते ६० वर्यांपर्यंतची मंडळी हुक्का पार्लरमध्ये व्यसनाच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळते.
गरीब-श्रीमंतीचाही
भेद नाही
अनेकदा हुक्का पार्लरमध्ये उच्चभ्रू वस्तीतील मंडळी आढळून येत असली तरी अगदी गरीब घरातील मुलेही यात अडकलेली असल्याचे पाहायला मिळतात. प्रसंगी चोऱ्या, जबरी
चोऱ्या करुनही या पार्लरमध्ये
आपला शौक पुरा करण्यासाठी ही तरुणाई धजावत असल्याचे विदारक चित्र आहे.
परवानगी नसल्यामुळे हर्बलचा देखावा
पानमसाला, गुलाबपाणी अशा ७० ते ८० प्रकारचे हुक्का पार्लर आहेत. मूळात निकोटीनयुक्त किंवा तंबाखूजन्य पदार्थ असलेल्या हुक्का पार्लरला राज्य सरकारने परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळेच पोलीस किंवा स्थानिक राजकीय नेत्यांशी आर्थिक हातमिळवणी करीत हर्बलचा देखावा करुन तंबाखूजन्य पदार्थांचे हुक्का पार्लर राजरोजसपणे सुरु असतात.
काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
ज्याठिकाणी हर्बलचे हुक्का पार्लर आहेत, त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचेही सर्रास नियम पायदळी तुडविले जातात. हुक्का घेणाऱ्यांमधील अंतर, मास्क न लावणे इतरही कोरोनाशी निगडीत नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्यामुळे अशा हुक्का पार्लरची पोलिसांकडून वारंवार तपासणी करण्याचीही मागणी जोर धरु लागली आहे.