शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:12 PM2021-03-11T23:12:35+5:302021-03-11T23:12:55+5:30

मुरबाडमध्ये निकृष्ट धान्याचा पोल्ट्री फार्मसाठी होत आहे वापर

Smooth distribution of foodgrains at ration fair price shops | शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

googlenewsNext

सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर आता कार्डधारकाची खात्री पटवून अन्नधान्य देण्यासाठी  त्यांचे ऑनलाइन थम्ब  घेतले जात आहेत. त्यामुळे योग्य व मूळ कार्डधारकालाच अन्नधान्य मिळाल्याची खात्री होत आहे. जिल्ह्यातील या रास्त भाव दुकानांवरील अन्नधान्य पुरवठा सुरळीत व योग्य दर्जाचा होत असल्याचे आढळले. मात्र, मुरबाड तालुक्यातील शेतकरी सहकारी संघाच्या रेशनिंग दुकांनावरील अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा वापर थेट पोल्ट्री फार्मसाठी केला जात असल्याचे आढळले आहे.     

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण आदी दोन विभागांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या शिधावाटप विभागाकडून अन्नधान्याचा पुरवठा रास्त भाव दुकानांना केला जात आहे. कोरोना महामारीच्या संचारबंदीत या दुकानांमधील अन्न धान्य पुरवठ्यावर नागरिकांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य झाले. जिल्ह्याच्या शहरी भागात सात लाख १७ हजार ४८ हजार  या अंत्योदय कार्डधारकांना दरमहा ३५ किलो अन्नधान्याचे वितरण होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गहूऐवजी तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरत आहे. 
यामुळे या ३५ किलो अन्नधान्यामध्ये २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू या अंत्योदय कार्डधारकास वितरण केले जात आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलोने या ग्राहकांकडून गव्हाची खरेदी केली जात आहे. या प्रमाणेच प्राधान्यक्रमाच्या कार्डधारकांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे. 

शेतकरी सहकारी संघाला निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनव्दारे रेशनिंग दुकानांवरही ग्रामस्थांना अन्नधान्य वितरण केले जात आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील काही दुकानांमध्ये वितरित करण्यात येणारे अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कार्डधारकांकडून या अन्नधान्याची खेरदी केली जात नाही. त्यामुळे मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या या रेशनिंग दुकांनांवरील अन्नधान्य सध्या पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांसाठी वापरले जात असल्याचे या सहकारी संघाचे सेल्समन जे. एस. घुडे यांनी निदर्शनात आणून दिले आहे. 

nयामध्ये तीन रुपये दराने तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू प्रति किलो दोन रुपये दराने वितरण केले जात आहे. 
nया पाहणीमध्ये बहुतांशी शिधावाटप विभागाच्या रास्त भाव  दुकानांवर चांगल्या दर्जाचे अन्नधान्य वाटप केले जात आहे.
nत्यामुळे अंत्याेदय व प्राधान्यक्रम कार्डधारकांकडून त्यांचा लाभ घेतला जात आहे.

शिधावाटप दुकानांवर उत्तम दर्जाचे 
अन्नधान्याचे वितरण 
जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना आमच्याकडून अन्नधान्यपुरवठा केला जात आहे. एफसीआयव्दारे आम्हाला या अन्नधान्याचा पुरवठा होत आहे. अन्नधान्य उत्तम दर्जाचे जिल्ह्यातील दुकानांवर वितरण केले जात आहे. एखादी गोणी किंवा पोत्यातील गहू, तांदूळ खराब निघाले तर आम्ही त्या बदल्यात दुकानदारास उत्तम दर्जाचे दुसरी गोणी किंवा पोते देतो. पण कार्डधारकास उत्तम दर्जाचे गहू, तांदूळ जिल्ह्यात पुरवठा केला जात आहे. आम्ही पुरवठा केलेले अन्नधान्य पोल्ट्री फार्मला वाटप केले जात नाही, तसे आढळून आल्यास दुकानदारांवर त्वरित कडक कारवाई करण्यात येईल.
    - राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे
 

Web Title: Smooth distribution of foodgrains at ration fair price shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे