चरस हॅशची इन्स्टावर जाहिरात करुन तस्करी करणाऱ्यास अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By जितेंद्र कालेकर | Published: February 9, 2024 07:09 PM2024-02-09T19:09:54+5:302024-02-09T19:10:18+5:30

भालेराव याने चक्क इन्स्टाग्रामवर गांजाची जाहिरात केली होती.

Smuggler Arrested for Advertising Charas Hash on Instagram 31 lakh worth of goods seized | चरस हॅशची इन्स्टावर जाहिरात करुन तस्करी करणाऱ्यास अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चरस हॅशची इन्स्टावर जाहिरात करुन तस्करी करणाऱ्यास अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे: चरस या अमली पदाथार्पासून बनविलेल्या चरस हॅश ऑईलची इन्स्टाग्रामवर जाहीरात करुन त्याची तस्करी करणाऱ्या ऋषभ संजय भालेराव (रा. रजनीगंधा सोसायटी, शहापूर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून १३ लाख ५० हजारांच्या १३५ ग्रॅम चरस हॅशसह ३१ लाख दोन हजारांचा अमली पदाथार्चा साठा जप्त केला आहे.

वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर, भाजी मार्केटजवळ ऋषभ भालेराव हा त्याच्या गिऱ्हाईकांना गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन, उपनिरीक्षक तुषार माने आणि सुनिल अहिरे आदींच्या पथकाने सापळा रचून भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार २०० रुपयांचा तीन किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा, १२ हजार ७०० रुपयांचा एक मोबाईल आणि रोकड असा ४२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडील सखोल चौकशीमध्ये त्याच्या बदलापूर येथील घरातून आणखी ६० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा, २९० ग्रॅम चरस आणि १९ छोटया बाटल्यांमध्ये चरस (हॅश) ऑईल आणि इतर वस्तू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
इन्स्टाग्रामवरुन ऑनलाईन विक्री -
भालेराव याने चक्क इन्स्टाग्रामवर गांजाची जाहिरात केली होती. त्यासाठी गिऱ्हाईक मिळण्यासाठी तो इन्स्टाग्रामपच्या पवरुन ऑनलाईन अमली पदाथार्ंची विक्री करीत करीत होता. ही माहिती तपासात निदर्शनास आली आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर साडे तीन हजारांहून अधिक फॉलोअर्स असून त्याद्वारे येणाऱ्या गिऱ्हाईकांचे हाईकांचे ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर कुरिअर मार्फतीने तो होम डिलीवरी करीत असल्याचे उष्घड झाले. ठाणे जिल्हयात प्रथमच अशा प्रकारे चरस या चरसपासून तयार केलेल्या हॅश ऑइ्रलची विक्री केली जात होती. त्याने मध्यप्रदेशातून हा गांजा आणला होता. त्याचे आणखी कोणी साीदार आहेत का? आदी सर्व बाबींचा तपास आता सुरु आहे. त्याला १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Smuggler Arrested for Advertising Charas Hash on Instagram 31 lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.