टिटवाळ्यात 4 फुटी लांब व 5 किलो वजनाचा साप घोणस जातीचा साप सापडला

By admin | Published: October 31, 2016 06:35 PM2016-10-31T18:35:01+5:302016-10-31T18:35:01+5:30

मृत सिध्दी सोसायटीलगत असणाऱ्या चाळीतील पडीत जागेत साप असल्याचे येथील रहिवाशांना समजले. त्यांनी तातडीने सर्पमित्र राहूल साळवे यांच्याशी संपर्क साधला.

Snake snake found 4-foot-long and 5 kg snake-snake | टिटवाळ्यात 4 फुटी लांब व 5 किलो वजनाचा साप घोणस जातीचा साप सापडला

टिटवाळ्यात 4 फुटी लांब व 5 किलो वजनाचा साप घोणस जातीचा साप सापडला

Next

ऑनलाइन लोकमत

टिटवाळा, दि. 31 -  येथील दळवीवाड्यातील अमृत सिध्दी सोसायटीलगत असणाऱ्या चाळीतील पडीत जागेत साप असल्याचे येथील रहिवाशांना समजले. त्यांनी तातडीने सर्पमित्र राहूल साळवे यांच्याशी संपर्क साधला. 

सध्या शाळेला सुट्टी लागलेली असल्याने बच्चेकंपनी घरीच दिसून येत आहे. दळवीवाड्यातील आमृत सिध्दी ससोसायटी लगत असणाऱ्या चाळीच्या बाहेर खेळायला गेलेल्या काही मुलांना हा साप दिसून आला.  याची माहिती मुलांनी पालकांना देताच पालकांनी  आपले लोकमतचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी सर्पमित्र साळवे यांना साप निघाला असल्याचा फोन केला. सर्पमित्र मित्र आपल्या दुचाकीवरून घटनास्थळी पोहचले. त्यांनी बघताच सांगितले की हा खुप विषारी घोणस जातीचा साप आहे. मोठय़ा शिताफीने राहूळ साळवे व  विकी निरसट यांनी सदर सापाला पकडून फळेगांव येथील जंगलात सोडून दिले. 

Web Title: Snake snake found 4-foot-long and 5 kg snake-snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.