ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान
By सुरेश लोखंडे | Published: December 18, 2022 02:04 PM2022-12-18T14:04:45+5:302022-12-18T14:05:39+5:30
भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे.
ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ४२ पैकी ३५ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. यासाठी १३७ केंद्रांवर आतापर्यंत २४ हजार ८४३ जणांनी मतदान केले. आतापर्यंत ३७.३५ टक्के मतदान नशीब अजमावत असलेल्या ७२७ उमेवारांना झाले आहे. यातील ३५ सरपंचांसाठी ११४ उमेदवारांचा समावेश आहे. या केंद्रांवरील मतदान शांततेत व्हावे,कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस अधिकारी, पोलिसांसह ९९० जणांचे मनुष्यबळ तैनात आहे.
जिल्ह्यातील सुमारे सात ग्रा.पं. चे सदस्य व सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत. आता अवघ्या ३५ ग्रामपंचायतींच्या २१९ सदस्यांसाठी व ३४ सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. तर मुरबाडला ११ ग्रामपंचायतींसाठी ३५ मतद केंद्र तैनात आहेत. कल्याण तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठ २४ मतदान केंद्र आहेत. तर शहापूरच्या तीन ग्राम पंचायतीचे मतदान सात केंद्रांवर होणा आहे. या आधी बिनविरोध विजयी झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील असोळे, किशोर, वैशाखरे आ चार ग्रामपंचायतीचा समावेश आहे. शहापूर येथील बाबळे, भिवंडीतील खानिवली आणि कल्याण तालुक्यातील काकडपाड ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.