आतापर्यंत ९ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:28 AM2021-06-05T04:28:30+5:302021-06-05T04:28:30+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आधी ५ आणि आता आणखी ४ म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांच्या ...

So far 9 successful surgeries on myocardial infarction patients | आतापर्यंत ९ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

आतापर्यंत ९ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आधी ५ आणि आता आणखी ४ म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले असून, आतापर्यंत एकूण ९ रुग्ण उपचारानंतर सुखरूप घरी परतले आहेत.

कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्ण बरा करू शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखवले असून आजपर्यंत ९ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. सद्य:स्थितीत म्युकरमायकोसिसची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तत्काळ दाखल करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ५ तर सध्या ४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत. म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीसाठी डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ आदी डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

Web Title: So far 9 successful surgeries on myocardial infarction patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.