...म्हणून महासभा ऑफलाइन घेण्यात यावी; भाजप नगरसेवकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:08 AM2021-01-29T00:08:02+5:302021-01-29T00:08:17+5:30
हिंदुस्तान गॅरेजजवळील कचराकुंडी बंद करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यासाठी बसथांबा केला असून, याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले.
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. शहर व नागरिकांच्या हिताचे विषय मांडता येत नाहीत तसेच ठराव व मतदानाबाबत भूमिका मांडता येत नसल्याने नगरसेवकांच्या नैसर्गिक अधिकारांवर ऑनलाईन महासभेमुळे गदा येते. यापुढे ऑफलाईन महासभा घेण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या १४ नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून केली आहे.
बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, मदनसिंह, चंद्रकांत वैती, रवी व्यास, विनोद म्हात्रे, डॉ . सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल, दौलत गजरे, गणेश भोईर, पंकज पांडेय, नीला सोन्स, जयेश भोईर, वैशाली रकवी, विजय राय आदी नगरसेवकांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली. या भेटीत शहरातील विविध समस्या, नागरिकांना सुविधा देणे तसेच नगरसेवकांच्या प्रभागांतील कामे यावर चर्चा झाली तर ऑनलाईन महासभा बंद करून ऑफलाईन महासभा घ्या, असे निवेदन देण्यात आले.
हिंदुस्तान गॅरेजजवळील कचराकुंडी बंद करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यासाठी बसथांबा केला असून, याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया, उपमहापौर इम्रान वली मोहमंद खान, आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक सावंत, नगरसेवक मलिक मोमीन, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे, प्रभाग अधिकारी दिलीप खाने, प्रभाग समिती कार्यालयीन अधीक्षक मकसुद शेख, प्रभाग आरोग्य निरीक्षक एम. पी. विशे, गोविंद गंगावणे, आदी उपस्थित होते. नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकू नये. त्याचबरोबर शहरातील कचराकुंड्या बंद करून तेथे सुशोभीकरण करावे, नागरिकांनी स्वच्छ भिवंडी शहर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
बोलायला मिळत नाही
ऑनलाईन महासभेत नगरसेवकांना बोलायला मिळत नाही. त्यांना ठराव काय झाला ? व मतदान झाले का ? याची माहिती नसताना तसेच प्रत्येक नगरसेवकास न विचारताच मतदान नोंदविले जाते. जे कायदेशीरदृष्ट्या बेकायदा आहे. ऑनलाईनमुळे शहर व प्रभागातील समस्या, विकासकामे तसेच विषयांवर नगरसेवकांना बोलताच येत नाही. नगरसेवकांना बोलायलाच दिले जात नसेल तर महासभेचा उपयोग काय ? असे सवाल केले आहेत.