... तर नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात -आनंद नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 12:20 AM2021-02-04T00:20:45+5:302021-02-04T00:21:29+5:30

Relationships : महाविद्यालय परिसरात मार्गदर्शनाचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आदिम, उत्पादक आणि पुरोगामी भावना आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याच्या वर्तनाशी असलेल्या नात्यांबद्दलही सांगितले.

... so you can experience wonderful moments in relationships - Anand Nadkarni | ... तर नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात -आनंद नाडकर्णी

... तर नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात -आनंद नाडकर्णी

Next

ठाणे  - महाविद्यालय परिसरात मार्गदर्शनाचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आदिम, उत्पादक आणि पुरोगामी भावना आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याच्या वर्तनाशी असलेल्या नात्यांबद्दलही सांगितले. जमाखर्चाचा हिशोब संपला की नात्यांमध्ये अद्भुत क्षण अनुभवता येतात तसेच, शिक्षक- मार्गदर्शक व विद्यार्थी यांच्यामधले नाते हे कधीही संपत नाही असे ते म्हणाले.

जोशी- बेडेकर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, तत्त्वज्ञान विभाग आणि समुपदेशन कक्ष यांनी मंगळवारी विविध वर्गांचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक मेंटर्ससाठी मेंटर्सशिपवर एका ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. आधारातून गुणवत्तेकडे असे या कार्यशाळेचे नाव होते. नाडकर्णी व एसएनडीटी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि समुपदेशक डॉ. अनुराधा सोवनी हे या कार्यशाळेतील मुख्य वक्ते होते.

सकारात्मक बदल घडविण्यासाठी मेंटर्सनी कार्यरत राहणे यावर नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सकारात्मक बदल घडवून आणण्याबाबत आपले विचार व्यक्त करताना त्यांनी गुरू- शिष्यांमधले नाते हे कधीच संपत नाही, असेही शेवटी सांगितले. प्राचार्या व तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. सुचित्रा नाईक यांनीही विचार व्यक्त केले. कार्यशाळेत सुमारे ९८ शिक्षक व मार्गदर्शक सहभागी झाले होते. अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाच्या समन्वयक डॉ. रश्मी अग्निहोत्री यांनी प्रारंभी महाविद्यालयातील सध्याची मेंटरिंग प्रणाली व त्याचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेचा समारोप पसायदानाने करण्यात आला. 

अनुराधा सोवनी यांचे मार्गदर्शन 
मेंटरिंग ही औपचारिक आणि मोजमाप करता येईल अशी प्रणाली म्हणून विकसित करणे यावर डॉ. अनुराधा सोवनी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनाची प्रणाली बळकट करण्यासाठी तसेच त्याची औपचारिक नोंद करण्यासाठी संस्थेच्या विविध भागधारकांबरोबर जसे की विद्यार्थी, माजी विद्यार्थी इत्यादी. सहयोगात्मक उपक्रम आयोजित करण्यावर भर दिला. 

Web Title: ... so you can experience wonderful moments in relationships - Anand Nadkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.