प्रभाग ५२ मध्ये समस्यांचा सुळसुळाट
By admin | Published: August 6, 2015 02:52 AM2015-08-06T02:52:47+5:302015-08-06T02:52:47+5:30
‘ड’ क्षेत्रअंतर्गत प्रभाग क्रमांक ५२, विजयनगरमध्ये विशेष निधीतून साई गणेश विहारच्या दोन्ही बाजूला व साहिल प्लाझा व शुभम टॉवर फेज २ येथे बांधलेल्या सिमेंटच्या
दिवाकर गोळपकर , कोळसेवाडी
कल्याण (पूर्व) ‘ड’ क्षेत्रअंतर्गत प्रभाग क्रमांक ५२, विजयनगरमध्ये विशेष निधीतून साई गणेश विहारच्या दोन्ही बाजूला व साहिल प्लाझा व शुभम टॉवर फेज २ येथे बांधलेल्या सिमेंटच्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
धोकादायक विजेचे खांब हलविण्यासंदर्भात महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल प्रशांत काळे यांनी खंत व्यक्त केली. विजयनगरनाका, काटेमानवली, सेंट थॉमस शाळेजवळ अष्टमी अपार्टमेंटसमोर साईकृपा पार्कजवळ अगदी जीर्ण झालेले विजेचे खांब, अतिशय धोकादायक झाले आहेत. प्रभागाची लोकसंख्या १३ हजार असून २८ चाळी व १८४ इमारती या प्रभागात मागसवर्गीय १५ टक्के, दक्षिण भारतीय ३० टक्के, उत्तरभारतीय ३० टक्के, महाराष्ट्रीयन २५ टक्के अशी लोकवस्ती आहे.
पाण्याची अतिशय बिकट अवस्था होती. विजयनगर व चिंचपाडा येथे दोन लाईन्स होत्या. त्या काळात मनपाचे पाणी मिळते ही रहिवाशांना कल्पनाच नव्हती, ते बोअरवेलचे पाणी वापरत असत.
प्रभागात कोठेही सार्वजनिक शौचालय नाही. पण चाळींमधील सेफ्टी टॅँक तक्रारीनुसार साफ केले जातात. संपूर्ण प्रभागातील गटारे बांधून बंदिस्त केली आहेत. सूर्यतेज दोन चाळी, गुलमोहर, गुरुदत्त सहा, शिवनंदिनी ५ चाळी इ. भागात गटारे बांधली गेली आहेत. २८ चाळींच्या व जितेंद्र निवास, गणराजनगर पाच, लक्ष्मी कॉलनी चार परीसरात लाद्या बसविल्या आहेत.
२८ रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून सात रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण करण्यात आले आहे. अनेक रस्त्यांवर पाईपलाईन घेण्यासाठी खोदाई झाल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे होऊन पाणी साचले आहे. प्रत्येक वाहनचालक या खड्यांमुळे व्यस्त आहे. प्रभागात कचरा कुंड्या नाहीत, घंटागाडीची लोकांनी सवय लावून घेतली आहे. परंतु इतर प्रभागातील नागरिक कचऱ्याच्या पिशव्या टाकतात असे सांगण्यात आले.
‘ड’ प्रभाग कार्यालयासमोरील जागेत ८१०० स्क्वे.मी. जमिनीवर सुशोभिकरणाद्वारे जॉगिंग ट्रॅक, योगा केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ शेकडो नागरिक घेतात.