आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम काही मंडळी करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 03:55 PM2021-12-11T15:55:32+5:302021-12-11T16:08:22+5:30
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ९९ टक्के आघाडीत लढतील असा विश्वास राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. परंतु दोनही पक्षातील काही विघ्न संतुष्ट मंडळी या दुधात मीठाचा खडा टाकण्याचे काम करीत असल्याचेहा गोप्यस्फोटही त्यांनी केला. परंतु आपला वैचारीक शत्रु हा भाजप असल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे आले तरी चालणार आहे. परंतु आघाडी ही करावीच लागणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे सुतोवाच केले. आगामी निवडणुकीसाठी आपल्याकडे आता फक्त 90 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यानुसार आता आळस झटकून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
प्रत्येकाच्या घराघरात पोहचले पाहिजे, बुथ लेव्हलची रचना, वॉर्ड रचना आदींची कामे वेगाने करुन भाजपने नोटबंदी, जीएसटी आणि इतर कोण कोणत्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याची माहिती ही प्रत्येकाला देण्याचे काम कार्यकत्र्याने करायला हवे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिली. राज्यात देखील महाविकास आघाडीचे काम हे योग्य पध्दतीने सुरु असून शरद पवार यांच्या नंतर राज्यासाठी काम करणारा कोण नेता असेल तर ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे असल्याचेही सांगत मुख्यमंत्र्यांचे त्यांनी पुन्हा कौतुक केले.
एका कुटुंब प्रमुखाप्रमाणो ते काम करीत आहेत. येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी होईल असे मला नक्की वाटत आहे, कदाचित एकनाथ शिंदे यांना देखील तसेच वाटत आहे. त्यामुळे आमच्यात काही गोष्टींवरुन वाद जरी होत असले तरी ते काही वेळेस पाण्यावरुन, कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून होत आहेत. मात्र ते तेवढय़ापुर्ती असल्याने आघाडी ही निश्चित होईल असे सुतोवाच त्यांनी पुन्हा केले.
संजय राऊतांनी माणसुकीचे दर्शन घडविले-
शरद पवार यांच्यासाठी संजय राऊतांनी खुर्ची उचलून दिली. यावरुन भाजपची मंडळी टिका करीत आहेत. परंतु एका वडलीधा:या माणसाला राऊतांनी केलेली मदत म्हणजेच त्यांनी यातून एकप्रकारे यातून माणसुकीचे दर्शन घडविले आहे. मात्र भाजपमध्ये तर लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठी देखील जागा दिली जात नाही, ही त्यांच्या संस्कृती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सोशल मिडीयावर सक्रीय राहून निवडणुक जिंकता येत नाही
यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याचे देखील यावेळी आव्हाड यांनी कान टोचले. फेसबुक, ट्विटरवर सक्रीय राहून निवडणुक जिंकता येत नसल्याचे सांगत, मतदार नोंदणी, घराघरात जाऊन पक्षाचा अंजेडा रुजवा, आपण नगरसेवक नाही, म्हणून वॉर्डातील कामे करणो टाळू नका, लोकांची कामे करा, आता निवडणुकीत पडलो म्हणून पुढील पाच वर्ष कामच करायचे नाही, असे चालणार नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला.
ओबीसी आरक्षण कोण रोखतय..
जे कोण कोर्टात जात आहेत, ते सर्वाना माहित आहे. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा सुरु ठेवला आहे आणि तो सुरच ठेवणार आहे. शिक्षणात, नोकरीत, निवडणुकीत आरक्षण मिळत असेल, तर का काढत आहेत, समता आणि समानता ही शवेटी राजकीय असली पाहिजे ही भावना निती मंडळाने व्यक्त केली आहे. त्याची अंमलबजावणी शरद पवार यांनी राज्यात केली. मात्र येथील सर्वसामान्य शोषीत माणसाला राजकीय अधिकार मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे.