कोणी रिलॅक्स, तर कोणी टेन्शनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:28+5:302021-04-27T04:41:28+5:30

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या ...

Some relax, some in tension | कोणी रिलॅक्स, तर कोणी टेन्शनमध्ये

कोणी रिलॅक्स, तर कोणी टेन्शनमध्ये

Next

ठाणे जिल्ह्यात ११५०७७ विद्यार्थ्यांनी केली होती नाेंदणी

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अन्य बोर्डांच्या धर्तीवर महाराष्ट्र बोर्डानेही यंदाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी अव्वल येण्याच्या, सर्वोत्तम गुण मिळवण्याच्या दृष्टीने वर्षभर कसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये मात्र चिंता दिसते आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ११५०७७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

निकालासाठी कोणते निकष लावणार याबाबत आता विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.

दरवर्षी दहावीची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तणावाचे वातावरण असते. परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टींकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, ठाण्यातील मुलांच्या तर वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीच, मात्र परीक्षांबाबतही संभ्रमाचे वातावरण होते. अखेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षिता याला प्राधान्य दिल्याने काही पालक, विद्यार्थी खुश आहेत. ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०५७७८ आहे. निकालासाठीचे निकष लवकरच सरकार जाहीर करणार आहे. मात्र, वर्गात टॉप येण्यास इच्छुक, उत्तम काॅलेजमध्ये, अपेक्षित शाखेत प्रवेश मिळविण्याची इच्छा असणारे विद्यार्थी, पालक मात्र काहीसे विचारात आणि चिंतेत दिसत आहेत.

-----------

शाळा नसली तरी वर्षभर खूप अभ्यास केला. चांगले गुण मिळविण्याची अपेक्षा होती; पण आता काय निकष वापरतात माहीत नाही. त्यात मिळणाऱ्या गुणांनी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवताना खूप अडचणी येतील.

दिव्यांशी स्वामी, विद्यार्थिनी

-----------

निकालाचे निकष स्पष्ट झाल्याशिवाय काही कळणार नाही. अन्यथा अभ्यास करणारे व फारसा अभ्यास न करणाऱ्यांना जवळपास सारखे गुण दिले तर मग काय उपयोग राहील.

रणजिता महदुले, विद्यार्थिनी

-------------

दहावीच्या परीक्षांचे महत्त्व आपणच अवास्तव वाढविले आहे. ते येत्या काळात कमी होईल आणि झाले पाहिजे, तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारचा परीक्षेबाबतचा निर्णय योग्यच आहे. महामारीचा हा काळ पाहता यंदा आपण या परीक्षांच्या बाबतीत सरकार जे निर्णय घेईल ते मान्य केले पाहिजे आणि अभ्यास केलाच आहे, तर तसाच चांगला अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवून इच्छित ध्येय गाठा.

सुरेंद्र दिघे, शिक्षणतज्ज्ञ.

--------

तालुकानिहाय जिल्ह्यातील दहावीचे नोंदणीकृत विद्यार्थी

ठाणे महापालिका - २५७८४

नवी मुंबई - १३२५१

कल्याण-डोंबिवली, कल्याण ग्रामीण - १९९३३

उल्हासनगर - ४७७६

अंबरनाथ - ८७७०

मुरबाड - २७१६

शहापूर - ५०५२

भिवंडी, भिवंडी ग्रामीण - १३७६८

भाईंदर - ११७२८

Web Title: Some relax, some in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.